वैशिष्ट्यीकृतसंस्कृती

७ जुलैपासून’ जगद्गुरु’ श्री “संत तुकाराम” महाराज सह श्री “ज्ञानेश्वर माऊलीच्या” पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

Spread the love

संपादकीय,,,,

भारतातील सर्वात मोठा शिस्तबद्ध सोहळा म्हणलं तर पायी वारी, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळा गणला जातो, यालाच वारी असे म्हटले जाते, वारीचे प्रकार चैत्र वारी, माघी वारी, कार्तिकी वारी ,आणि आषाढी वारी ,अशा प्रकारच्या वारी असतात. भगवान श्रीकृष्णाचा अवतार विठ्ठलाचा आहे. भक्त पुंडलिकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने विठ्ठलाचे रूप धारण केले पुंडलिकाने, माता पित्याची सेवा करून झाल्यावर भगवंतांना वंदन केले होते, परब्रम्ह भक्तासाठी विटेवर उभा राहिल्याने या क्षेत्रास महत्त्व आहे, तसेच भक्त पुंडलिकाच्या भक्ती मुळे आजतागायत वारकरी संप्रदाय विठुरायाच्या अगोदर ,”पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम” असा जयघोष करतात,
तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनानंतर वारीची परंपरा त्यांचे धाकटे बंधू कान्होजी यांनी अखंडीत चालू ठेवली, तदनंतर तुकोबांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांच्या खांद्यावर दिली.
जगद्गुरु श्री तुकोबाराया यांच्या पादुका गळ्यात किंवा पालखी मध्ये ठेवून ज्येष्ठ वैद्य सप्तमी १६६५ यावर्षी चालू केली. देहू तुन  तुकोबांच्या पादुका तर आळंदीतून माऊलीच्या पादुका घेऊन पालखी सोहळा पंढरपूर कडे मार्गस्थ होत काही कारणास्तव. १८३२ यावर्षी माऊलीचा सोहळा वेगळा झाला काळानुसार दोन्ही पालखींना राजआश्रय प्राप्त झाला . मुघलांचा पालखीला उपद्रव होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांनी संरक्षण दिले होते शिंदे आणि शितोळे सरकार यांनी माऊली सोहळ्याला मोठा हातभार दिला होता,
तेव्हापासून ते आज पर्यंत अखंडितपणे श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा वारी सोहळा शिस्तबद्धपणे लाखोच्या संख्येने वारकरी भाविक अगदी मनोभावे पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत अशा या अद्भुत सोहळा येत्या सात जुलैपासून पंढरपूर कडे श्री विठुरायाच्या दर्शनाकरिता मार्गस्थ होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *