जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकी मध्ये वर्षानुवर्ष तीच आश्वासने!
संपादकीय….
निवडणुका म्हटले की, आरोप प्रत्यारोप आणि पक्षाचा जाहीरनामा हे अगदी ठरलेले असते, मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये वर्षानुवर्ष एकाच जाहीरनामावर पक्षाचं विजन ठरलेलं असतं, महिलांसाठी तरुणांसाठी वृद्धांसाठी पाण्याची सोय असो अशा विविध सेवांसाठी पक्ष नेहमीच कटिबद्ध राहील असा जाहीरनामा निवडणुकीपूर्वी वर्षानुवर्ष असाच पाहायला मिळतो हे वास्तव सतत निवडणुकीपूर्वी उमेदवाराकडून पाहायला मिळत आहे,
याचा अर्थ काय? पाठीमागच्या काळात असा विकास झाला नाही का? का जनतेची सतत दिशाभूल करायची हे सर्वसामान्य जनतेला पडलेले कोड आणखी उमजलं नाही, याच गोष्टीवर गावात गावातून सतत चर्चा होत असते, एकंदरीत पाहावयास गेले तर , निवडणूक झाल्यावर कुठलाही उमेदवार जनतेच्या कामाची एकनिष्ठ राहत नसून, पुढच्या पाच वर्षातच निवडणुकीच्या प्रचारार्थ काही गावांमध्ये येत असतात हेही वास्तव कोणी नाकारू शकत नाही, एकंदरी पहावयास गेले तर निवडणूक म्हणजे काय? निवडून गेलेल्या उमेदवाराचं काम काय? हे जोपर्यंत जनतेला समजणार नाही, तोपर्यंत निवडणूक असो वा जाहीरनामा असो यामधील पारदर्शकता कधीच स्पष्ट होणार नाही, याकरता जागरूक मतदाराने, मतदानापूर्वी योग्य उमेदवाराला, निवडून दिल्यावर त्यांची कामे योग्यरीत्या अभ्यासपूर्व सांगितल्यावरच मतदार करणे गरजेचे आहे, कारण समाजाच्या जनतेच्या विकासासाठी पैसा जो दिला जातो तो सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्स मधूनच पैसा कट होतो आणि तोच पैसा विकासाच्या नावाने जनतेला दिला जातो, याचाच अर्थ आपलाच पैसा आपल्याला देऊन आपल्या सर्वसामान्य जनतेलाच दिशाभूल केल्याचं काम केलं जातं, म्हणूनच यंदाच्या निवडणुकीमध्ये गावागावातून उच्चशिक्षित तरुण नागरिक महिला यांनी हा मूलमंत्र हाती घेऊन योग्य त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी पुढे येऊन समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू होत असल्याचे काही गाव मध्ये चित्र दिसत आहे,

