इंदापूरताज्या बातम्याराजकारण

भिगवन , शेटफळ गणामध्ये सरासरी ६७.३८% मतदान

Spread the love

                    नऊ तारखेपर्यंत उमेदवारांचे उत्कंठा शिगेला,

भिगवन/ प्रतिनिधी

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता याच अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका सात फेब्रुवारीला शांततेमध्ये पार पडल्या, मात्र काही ठिकाणी मोठ्या चुरशीच्याही निवडणुका झाल्या, याच अनुषंगाने भिगवन शेटफळ गणामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक पार पडली, या गटांमध्ये मित्रपक्ष राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा जरी थेट सामना रंगला असला तरी, अपक्ष उमेदवार तितकाच तुल्यबळ असल्याने सर्वांचे गणित बिघडल्याचे चित्र दिसत आहे , सात फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानामध्ये भिगवण शेटफळ कडे गणामध्ये 41990 मता पैकी 28 हजार 990 एकूण मतदान झाले, यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठ्या गनामध्ये म्हणजेच भिगवण गणामध्ये एकूण मतदान 21083 मतदानापैकी 13567 मतदान झाले तर शेटफळ गणामध्ये 20907 मतांपैकी 14723 मतदान झाले, सरासरी भिगवण गणामध्ये ६४ टक्के तर शेटफळ गनामध्ये 70 टक्के मतदान झाले, या झालेल्या तुल्यबळ लढतीमध्ये प्रामुख्याने उमेदवार 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान आपले नशीब आजमणार असल्याचे जरी दिसणार असले तरी मात्र एक दिवस अगोदर उमेदवारांमध्ये नक्कीच चिंतेचे वातावरण असणार असून कार्यकर्ते नेत्यांसह जनते ची उत्कंठा शिगेला पोहचणार आहे, यातच गावागावातून वाड्या वस्ती वरती पारावरती निकालावरतीच चर्चा होणार, आपापले कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची चर्चा होण्याने आणखीच प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये. थोड्या काही प्रमाणामध्ये संभ्रह मनामध्ये होणार हे मात्र नक्की, असो मात्र 9 फेब्रुवारी रोजी या गोष्टीसाठी सर्वांना वाट पाहावा लागणार तोपर्यंत तर्क वितर्क एक्झिट पोल , जनतेचा कौल कोणाला चर्चा तर होणारच,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *