इंदापूरविशेष मुलाखती

मराठा समाज इमानदार ,मनोज जरांगे पाटील

Spread the love

भिगवन / प्रतिनिधी

दिनांक 14 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता भिगवण येथील शासकीय विश्राम ग्रहा मध्ये पत्रकार परिषद पार पडली, यावेळी विविध प्रश्नावर मराठा समाजाचे आरक्षण कर्ते मनोज जरांगे यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना सडे तोडपणे उत्तर दिले , मराठा समाजाचे नेते मनोज जरागे पाटील यांचे भिगवण  येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले.  यावेळी त्यांच्या सत्कारासाठी  भिगवन मराठा समाजाचे कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात हजर होते विशेषता महिला भगिनी ही यावेळी आवर्जून उपस्थित होते जरांगे पाटलांच्या आगमनानंतर प्रथमता महिला भगिनींनी औक्षण करून त्यांचे भिगवन नगरीत स्वागत केले, यानंतर पत्रकार परिषद पार पडली यावेळी , आरक्षणाचा लढ्याचा प्रश्न, आरक्षणाची पुढची दिशा असो, किंवा मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का असो, किंवा पश्चिम महाराष्ट्र जीआरच्या निर्णय असो असे विविध प्रश्न यांना विचारण्यात आले यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तरपणे अगदी विस्तृतपणे प्रश्नांचे उत्तरे दिले, आरक्षणाचा लढा हा गरीब मराठ्यांचा लढा असून 28 लाख नोंदी कुणबी मिळाल्या असून या अगोदर एक नोंद काढायचे म्हणले तर खूप त्रास व्हायचा आता मात्र ते सुखकुर झाले असल्याचे सांगितले, त्याचप्रमाणे अजितदादांच्या मृत्यूचा संशय कुटुंबाला असला तर त्याचा योग्य प्रकारे तपास व्हायला पाहिजे अशी ही भावना त्यांनी व्यक्त केली, ओबीसी समाजाचा 1994 जी आर असून 25 ते 30 वर्ष पूर्वी त्यांचे प्रमाणपत्र निघत आहे तसं मराठा समाजाचा 75 वर्षात जी आर निघाला नाही आता जर जी आर  निघाला आहे तर काही ठराविक ओबीसी समाजाच्या नेत्यांनाच काय अडचण येते असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित   केला, पश्चिम महाराष्ट्राचा जीआर एक महिन्यात निघणार असल्याचे सांगितले कारण पुण्याच्या आयुक्तांशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले, त्याचप्रमाणे राजकारणात रस नसल्याचे राजकारणात प्रवेश करणार नाही मराठा समाजासाठी अहोरात्र काम करण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला, त्याचप्रमाणे मराठा समाजाचा अस्तित्वासाठी लढत असल्याचेही त्यांनी भावना व्यक्त केली, मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही हेही खात्री ने सांगितले कारण ओबीसी समाजाचा जीआर 1967 1994 आणि 2012 निघाला होता, त्यानुसार ओबीसी समाज प्रमाणपत्र काढून आपल्या मुलांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरी व कुठल्याही शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दाखला वैद्य ठरवला जातो, याच अनुषंगाने मराठा समाजाच्या नोंदी सन 18 81 नुसार मिळत आहेत , तरी मराठा समाजालाच जीआर ला काही ठराविक लोक विरोध करतात, वास्तविक पाहता  मराठा समाजाच्या कुणबी नोंदी 1881 साल च्या  मिळत असून कुणी कोणत्या जीआर ला विरोध केला पाहिजे हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न निर्माण केला, वास्तविक पाहता मराठ्यांना विरोध हे ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हेच करतात आणि, 376 जातीच्या नावाखाली काही ओबीसी नेते यांचे आरक्षण आतापर्यंत खात असल्याचे त्यांनी नाव न घेता छगन भुजबळांवर लावला, खऱ्या अर्थाने मराठा समाज गरीब असून त्यांच्या लढ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *