भिगवण येथे ‘राजमाता जिजाऊ’ व्याख्यानमालेचे “मनोज जरांगे पाटील” सह महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!
भिगवन/ प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या यांच्या वतीने शिवजयंती रौप्य महोत्सवी राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन शनिवार ( ता . १४ ) पासुन बुधवार ( ता . १८ ) पर्यंत सलग पाच दिवस सायंकाळी ७ वाजता शिवरत्न मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे . याच गोष्टीला अनुसरून खऱ्या अर्थाने जयंती उत्सव कसा साजरा करायचा याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ठिकठिकाणी जयंती महोत्सव पार पडत असतो पण कुठेतरी समाजाचा देणेकरी लागतो या भाऊनेने भिगवण येथील शिवजयंती महोत्सव गेली 25 वर्ष सातत्याने समाज प्रबोधन व्याख्याते यांचे आयोजन करून महाराष्ट्र मध्ये एक आगळा वेगळा उपक्रमाने समाजाच्या कामाने त्यांचे मोठे कौतुक होत आहे, कारण जयंती उत्सव म्हटलं की डीजे नाचणी गाणे हा प्रकार एकंदरीत पाहायला मिळतो पण यांच्या या उपक्रमाने नक्कीच त्यांची प्रेरणा घेणे गरजेचे आहे, या उपक्रमाचे उद्घाटन दिनांक 14 फेब्रुवारी सायंकाळी साडेसात वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला, यावेळी त्यांच्या समवेत व्याख्याते हास्य कवी अशोक नायगावकर, भिगवन नगरीचे प्रथम नागरिक गुराप्पा पवार, प्रायोजक पराग जाधव, माऊली भोसले, संदीप वाक्षे, मदनवाडी गावचे सरपंच नाना बंडगर, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम बंडगर पंचायत समिती सदस्य अजिंक्य माडगे, होते,
प्रथमता सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी आयोजकांच्या हस्ते करण्यात आला, कृषिमंत्री भरणे यांनी, यांच्या करत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले, गरीबाची सेवा हीच ईश्वर सेवा त्याचप्रमाणे माणसाने आनंदी रहा असा सल्लाही त्यांनी दिला, आणि गेले 25 वर्ष सातत्य ठेवलेल्या कामाचे भरघोस असे कौतुक केले, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचे करते करविते, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी, समाजावर येणाऱ्या संकटाचा संकटासाठी नेहमी मी खंबीर असल्याचे अधोरेखित केले, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनावर मी चालतो समाजाच्या हितासाठी गेले कित्येक दिवस मी काम करत असून या पुढील काळासाठी उपोषणाची वेळ आली तर पाठीमागे सरणार नाही हेही ठणकवून सांगितले, खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी शरीराचा विचार न करणारा एक कणखर नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने एक मराठा समाजाला लाभलेला एक वरदानच लाभलेल, आहे कारण उपोषण करून शरीराची अवस्था खूप बिघडलेले असून जास्त वेळ उभा राहता येत नसून चालण्याचा ही त्रास यांना होत आहे, मात्र समाजासाठी संपूर्ण राज्यांमध्ये ते अहोरात्र काम करत आहेत, नक्कीच त्यांचं काम कौतुकास्पद होत आहे, खरं पाहता जरांगे पाटील हे कुठल्या नेत्यांचे कौतुक करत नाहीत, मात्र यावेळेस त्यांनी दत्तामामा भरणे यांचे भरभरून कौतुक केले कारण, आसमानी संकटांना तोंड देण्याकरता शेतकरी वर्गासाठी जरांगे पाटलांनी त्यांना कॉल केला असता त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित आदेश देऊन आहेत तसा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत तत्पर केली याच गोष्टीमुळे दत्तमामा भरणे यांचे जरांगे पाटलांनी भरघोस असे कौतुक केले, त्याचप्रमाणे तुमच्याही हातात भरपूर आहे कर्जमाफी त्वरित करा असा सल्लाही त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला, यावेळी कार्यक्रमापूर्वी नुकतच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा यांना पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखद्मय अशा स्थितीमध्ये असून प्रथमता त्यांना संपूर्ण आयोजकाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम सुरू केला, कार्यक्रमाचे आयोजन, अखिल भारतीय मराठा महासंघ व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय पदाधिकारी , पराग जाधव, मस्कर सर , पांडुरंग जगताप वकील, वाळके ,डॉक्टर खरड, साळुंके, प्रशांत गायकवाड, विजय गायकवाड, यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी केले होते, यावेळी उजने एक्सप्रेस साप्ताहिकाचे संपादक अमोल कांबळे, यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल यांचा विशेष असा सन्मान मानचिन्ह व शाल देऊन करण्यात आला.

