जनावराची कत्तल करण्यासाठी राजरोजपणे वाहतूक! प्रशासनाचे दुर्लक्ष;
भिगवन/ प्रतिनिधी
गो माता रक्षणासाठी शासनाने कठीण कायदा केला असला तरी , मोठ्या प्रमाणात गाईंची कत्तल करण्याकरता ,कत्तलखाण्यामध्ये सायंकाळच्या सुमारास भिगवन परिसरातून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते,
हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचा दर्जा दिला जातो. गाईचे वासरांचे पूजन केले जाते. पण गाई वासरांची कत्तल करण्यासाठी काही राक्षस प्रवृत्तीचे लोक पैशासाठी स्वतःची घरे भागवण्यासाठी या बेकायदेशीर रित्या राजरोसपणे कत्तलखान्याला गुरे वासरे यांची बेकायदेशीर रित्या वाहतूक छूप्या पद्धतीने करण्यात येत असल्याची खुलेआम चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
प्रशासनाने देखील या रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या बेकायदेशीर कत्तल व्यवसायासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राक्षसी प्रवृत्ती लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे म्हणता येईल. तसेच हिंदू धर्मातील नागरिकांनी देखील आपल्या मातेचे रक्षण करणे ही आपली गरज आहे. अशी नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहे. गोरक्षक आशा जनावराचे तस्करी करणाऱ्या वाहनांवर कडवी नजर ठेवून प्रशासनाला याची कल्पना देत होते मात्र, यामध्ये गोरक्षकांनाच विनाकारण अडकवले जात असल्याच्या कारणास्तव, गो रक्षकांनी अंग काढून घेतल्याने , जनावराची कत्तल करण्याकरता जास्त प्रमाणात वाहन तस्करी होऊ लागली आहे, हिंदू धर्माचे पावित्र्य नक्कीच या गोष्टीमुळे कमी झाल्याचे दिसत आहे, म्हणूनच प्रशासनाने कायद्याचे जरब बसून कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनांवर तसेच संबंधित मालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून अशा प्रकारचे कृत पुढील काळात होणार नाही याची दक्षता गोहत्या करणारे मालका सहित वाहनधारक घेतील,

