बारामतीसंपादकीय

अखेर, अलोट गर्दीने,”शासकीय इतमात; दादांवर अंत्यसंस्कार! !

Spread the love
संपादकीय…..
दि 28 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी घडलेल्या विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सह इतर राज्यातील नागरिक नेते हळहळ व्यक्त करत आहेत, खऱ्या अर्थाने नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर अजित दादांचे नाव प्रामुख्याने आदराने घेतलं जातं, आपल्या कामाची सुरुवात सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच करणारे एक मात्र नेते म्हणजेच अजित दादा, यांनी संपूर्ण महाराष्ट्र जडणघडण मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, प्रशासनावरती वचक, स्पष्टवक्तपणा, विशेषता, कामासाठी भला मोठा भरलेला जनता दरबार, ही यांच्या कामाची खरी ओळख होती, यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना सर्वसामान्य महिला वर्ग कार्यकर्ते आमदार खासदार यांच्या वतीने बोलले जात आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र ला एक कणखर, दणकट, आणि समाज हिताचे काम करणारे उत्कृष्ट व्यक्तिमत्व हरपल्याने एक कोहिनूर हिरा महाराष्ट्राचा आधारवड हिरावून घेतल्याची खंत सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे, अशा या विकास रत्न, लोकांसाठी सतत वाहून घेणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याकरिता महाराष्ट्र सह इतर राज्यातील बहुसंख्य नागरिक विद्या प्रतिष्ठान च्या प्राणांगना मध्ये , 29 जानेवारी रोजी सकाळपासूनच हजर होते, सकाळी त्यांच्या राहत्या घरी काटेवाडी येथे लोकांना दर्शना करतात त्यांचे पार्थिव नेहण्यात आले होते यानंतर, बारामती मध्ये अकरा वाजता विद्यानगरीच्या प्राणांना मध्ये अंत्यविधीसाठी पार्थिव आणण्यात आले, आणि शासकीय इतमात, संपूर्ण पवार कुटुंब सहित महाराष्ट्र व इतर राज्यातील कार्यकर्ते नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी पार पडला, यावेळी , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना पोलीस प्रशासनामार्फत मानवंदा देऊन , बंदुकीच्या गोळींचे तीन फायरिंग करून सलामी देऊन, अजित दादा अमर रहे अशा जयघोषाने अखेरचा निरोप दिला
अजित दादाच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,
अनेक कार्यकर्त्यांना अश्रू  अनावर, महिला वर्गांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमता पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह परिवहन मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामविलास पासवान, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ खासदार शाहू महाराज, आंध्र प्रदेश मंत्री तारा योगेन, कृष्णाजी गेवराई ,श्रीनिवास रेड्डी, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोरे, आदिती तटकरे, गणेश नाईक ,पंकजा मुंडे, माझी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मा मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, गिरीश महाजन, जयदीप कवाडे, महादेव जानकर, रितेश देशमुख, अमोल कोल्हे, जय पाटील, बीके पाटील, नरहरी झिरवाळ, धैर्यशील मोहिते पाटील, मकरंद पाटील, विजय शिवतारे, शिवेंद्र राजे भोसले, शंकर राजे देसाई, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंगल प्रभात लोढा, प्रफुल पटेल, जयकुमार गोरे ,संजय राठोड, न्यायाधीश गवई, राधाकृष्ण विखे पाटील, अभिजीत कल्याणी, खासदार श्रीकांत शिंदे, निवेदिता माने, राजेश टोपे, संजय पाटील, सचिन आहेर, उद्धव ठाकरे ,राज ठाकरे, बाळाजी नांदगावकर, महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, यांच्या सह महाराष्ट्र व इतर राज्याच्या विविध पद अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने व अजित दादाच्या स्मृतीने त्यांनी केलेल्या कार्याच्या कामाच्या, आठवणींना उजाळा देऊन अजित दादा अमर रहेजा जयघोषाने आखेरचा निरोप देताना सर्वसामान्य जनतेच्या अश्रूंचा बांध फुटून जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *