राष्ट्र संघटनेतील मानवी श्रृंखलेत राष्ट्रीय सेवा योजना अव्वल”* – *डॉ अनिल बनसोडे*
राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिर २०२५-२६ मौजे राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी रा.से.यो. विभागीय समन्वयक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) प्रा.डॉ.अनिल बनसोडे यांची आढावा भेट
सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांना प्रोत्साहन व प्रेरणादायी होती.
भिगवण/प्रतिनिधी
शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे
दत्तकला काँलेज आँफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मौजे राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ अनिल बनसोडे यांची सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांशी संवाद साधून “राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगत असतानाच, राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेक जिल्हा, विद्यापीठस्तर, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास कसा साधला जातो याबद्दल मार्गदर्शन केले. स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी जास्तीत जास्त विविध राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमध्ये आपला सहभाग नोंदविला पाहिजे!” असे प्रतिपादन केले. तसेच, शिबीर काळात स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला, त्यांनी शिबीर कालावधीत केलेल्या श्रमदानाची माहिती घेतली.ते पुढे म्हणाले, “विशेष श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून समाज सेवेचे संस्कार व श्रमसंस्कार होत असतात. याबरोबरच संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊन सेवा देणार आहोत, त्या क्षेत्रात तुम्ही मानवतावादी राहून संवेदनशीलता जपून समाजाला सेवा दिली पाहिजे.”दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष श्रमदान शिबिर उत्साहात व यशस्वीपणे पार पडत आहे. या शिबिरास डॉ. अनिल बनसोडे सर यांनी सदिच्छा भेट देत स्वयंसेवकांचे मनोबल वाढवले.या विशेष श्रमदान शिबिरात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
यावेळी डॉ. अनिल बनसोडे यांनी युवकांनी समाजसेवेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी दत्तकला काँलेज आँफ फार्मसी येथील दत्तकला काँलेज आँफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुदर्शन नागराळे, प्रा मीना कुलकर्णी (तज्ञ व्याख्यात्या) व डॉ. तेजस्विनी अडसूळ, प्रा अमोल लवटे, डॉ नरेंद्र देशमुख प्रा मोनिका खाटमोडे, तसेच मौजे राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील सरपंच, उपसरपंच, रा.से.यो.चे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुदर्शन नागराळे यांनी केले. सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु. प्रगती घुले हिने केले. व डॉ. तेजस्विनी अडसूळ यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.


