“राष्ट्रीय सेवा योजना शिबिर : व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा”* – *डॉ अनिल बनसोडे*
राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिर २०२५-२६ मौजे कुरवली ता.इंदापूर या ठिकाणी रा.से.यो. विभागीय समन्वयक(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) प्रा.डॉ.अनिल बनसोडे यांची आढावा भेट.
भिगवन / प्रतिनिधी
मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी इंदापूर तालुका ग्राम विकास संस्थेच्या विश्वासराव रणसिंह महाविद्यालय कळंब राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मौजे कुरवली ता: इंदापूर जिल्हा पुणे येथे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ अनिल बनसोडे यांची सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांशी संवाद साधून “राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगत असतानाच, राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेकविध जिल्हा, विद्यापीठस्तर, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास कसा साधला जातो याबद्दल मार्गदर्शन केले. स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी जास्तीत जास्त विविध राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमध्ये आपला सहभाग नोंदविला पाहिजे!” असे प्रतिपादन केले. तसेच, शिबीर काळात स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला, त्यांनी शिबीर कालावधीत केलेल्या श्रमदानाची माहिती घेतली.
इंदापूर तालुका ग्राम विकास संस्थेच्या विश्वासराव रणसिंह महाविद्यालय कळंब महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार डांगे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा सुवर्णा बनसोडे , प्रा डॉ सुधीर इंगळे (तज्ज्ञ मार्गदर्शक व्याख्याते), प्रा. डॉ. अमर वाघमोडे प्रा. ज्ञानेश्वर गवळी, प्रा. रवी गायकवाड , प्रा. महादेव माळवे, प्रा. नितीन रुपनवर, प्रा. सोमनाथ चव्हाण, प्रा. आकांक्षा मेटकरी व इतर सहकारी प्राध्यापक रासेयोचे 75 स्वयंसेवक आणि स्वयंसेविका, तसेच कुरवली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


