भिगवन शेटफळगडे मतदार संघात उमेदवारी साठी ” हाय व्होल्टेज ड्रामा?
भिगवन/ प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागलेले असून याच गोष्टींनी इंदापूर तालुक्यातील भिगवन शेटफळगडे मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे, यातच इंदापूर तालुक्यातील कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक हर्षवर्धन पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्ये मनमिलाप झालेल्या चर्चेने , तालुक्यातील वातावरण वेगळे झाल्याचे दिसून येत आहे, नक्की राजकारणामध्ये चाललय काय याचं सर्वसामान्य जनतेला पडलेलं फार मोठं कोडं समजणं अशक्य आहे, याच गोष्टींमध्ये सर्वसामान्य व एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याची फारपत झालेले दिसून येत आहे यातच “आयाराम गयाराम “यांना खूप मोठा भाव आल्याचे दिसून येत आहे, यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चितच समजणं गरजेच आहे की सर्वसामान्य जनतेने किंवा एक निष्ठाने काम करणं योग्य की अयोग्य या गोष्टीची कार्य मीमांसा करणे कठीण होत चाललेला आहे, असो राजकारण म्हटलं तर काहीही होतं, हे मात्र आता वास्तव्यामध्ये दिसून येत आहे,
भिगवण शेटफळगडे मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी अवघी एक दिवस शिल्लक असताना उमेदवार साठी आणखी कोणता उमेदवार निश्चित झालेला नाही किंवा केला गेला नाही याचं पक्ष श्रेष्ठींना खूप मोठा आव्हान असणार आहे कारण भिगवण शेटफळे मतदार संघामध्ये , मा, जी परिषद सदस्य प्रमिलाताई जाधव , हेमाताई ,माडगे मा आदर्श सरपंच सारिकानानी बंडगर, विद्यमान सरपंच अश्विनी बंडगर, स्वप्नाली बंडगर, मा पंचायत समिती सदस्य मेघना बंडगर , यांनी मोर्चे बांधणी केल्याने राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारीसाठी खूप मोठ्या डोकेदुखीचा समस्यांना तोंड द्यावा लागणार आहे, हे उमेदवार फक्त भिगवन व मदनवाडी परिसरातील मात्र आसपासच्या 18 गावांच्या इच्छुकांचं काय? यांनी काय फक्त पक्षातच काम करायचं काय, नुसत्या सतरंज्याच उचलायचा काय? असं सर्व सामान्य जनतेमधून बोललं जात आहे, सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असो एकंदरीत पाहता होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक खूप मोठा “हाय होल्टेज ड्रामा” तसेच रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे .

