इतरदौंड

व्यक्तिमत्व विकासाबरोबरच समाज विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान”* – *डॉ अनिल बनसोडे*

Spread the love

भिगवन / प्रतिनिधी

मंगळवार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी “दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूसन्स, फॅकल्टी ऑफ इंजीनियरिंग, स्वामी चिंचोली” राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मौजे रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ अनिल बनसोडे यांची सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांशी संवाद साधून “राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगत असतानाच, राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेकविध जिल्हा, विद्यापीठस्तर, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिबिराच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास कसा साधला जातो याबद्दल मार्गदर्शन केले. स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी जास्तीत जास्त विविध राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमध्ये आपला सहभाग नोंदविला पाहिजे!” असे प्रतिपादन केले. तसेच, शिबीर काळात स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला, त्यांनी शिबीर कालावधीत केलेल्या श्रमदानाची माहिती घेतली.ते पुढे म्हणाले, “विशेष श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून समाज सेवेचे संस्कार व श्रमसंस्कार होत असतात. याबरोबरच संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊन सेवा देणार आहोत, त्या क्षेत्रात तुम्ही मानवतावादी राहून संवेदनशीलता जपून समाजाला सेवा दिली पाहिजे.”दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष श्रमदान शिबिर उत्साहात व यशस्वीपणे पार पडत आहे. या शिबिरास डॉ. अनिल बनसोडे सर यांनी सदिच्छा भेट देत स्वयंसेवकांचे मनोबल वाढवले.या विशेष श्रमदान शिबिरात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई तसेच सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
यावेळी डॉ. अनिल बनसोडे सरांनी युवकांनी समाजसेवेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करत श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी “दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूसन्स, फॅकल्टी ऑफ इंजीनियरिंग, स्वामी चिंचोली” राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा कमलकिशोर शर्मा, प्रा मीना कुलकर्णी (व्याख्यात्या) व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री बारवकर, प्रा मदिना तांबोळी, प्रा भापकर, प्रा देवकाते, तसेच मौजे रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील सरपंच, उपसरपंच, रा.से.यो.चे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा कमलकिशोर शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु. प्रिती धापके हिने केले. व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री बारवकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *