इंदापूरवैशिष्ट्यीकृत

भिगवन पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न!

Spread the love
भिगवन /प्रतिनिधी
सहा जानेवारी हा पत्रकार दिन मोठ्या उत्साह मध्ये संपूर्ण भारतामध्ये पार पडत असतो याच गोष्टीला अनुसरून भिगवन येते बुद्ध विहार च्या प्राणांगणामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्सवामध्ये पार पडला
पत्रकार दिन 6 जानेवारी हा दिवस ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ चे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी 1832 मध्ये पहिल्यांदा वृत्तपत्र प्रदर्शित केल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी त्यांनी त्यांचे वृत्तपत्र चार भाषेमध्ये प्रसिद्ध केले होते, मराठी, इंग्रजी उर्दू आणि मोडी आणि त्यावेळी त्यांनी पहिला लेख अंधश्रद्धा याविषयी मांडला होता….
पत्रकार दिन हा पत्रकारांच्या अथक प्रयत्नांना सन्मान देणारा दिवस आहे.
समाजातील समस्या उघडकीस आणून जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.
पत्रकार दिन आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देतो. सत्य, निष्ठा, आणि पारदर्शकतेची मूल्ये जपणे हा पत्रकारांचा मुख्य उद्देश असतो… म्हणूनच पत्रकारांच्या कार्याला उजळा देण्याकरिता या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिगवण पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, भिगवन नगरीचे प्रथम नागरिक गुराप्पा पवार, भिगवन ग्रामपंचायत उपसरपंच कपिल भाकरे, जि, प, सदस्य हनुमंत बंडगर, पराग जाधव,इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपत बंडगर, मा तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत शेलार, सचिन बोगावत, मा सरपंच वंदना शेलार सामाजिक कार्यकर्ते सोनाली स्वप्नील बंडगर, अशोक शिंदे, देवानंद शेलार गुरुजी, स्वप्निल बंडगर, अनिकेत भिसे, रोटरी क्लबचे मा अध्यक्ष संतोष सवाने, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे , डॉ खानवरे , अण्णा धवडे प्रदीप वाकसे , रोहित शेलार सह भिगवण पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते, प्रथमता प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला, डॉ काशिनाथ सोलंकर यांनी प्रास्ताविक भाषणांमध्ये सुसंस्कृतपणे पत्रकार दिनाचे महत्त्व पटवून दिले व पत्रकार भवन रखडलेली इमारत लवकरात लवकर काम योग्य व्हावी अशी इच्छा व्यक्त केली, सचिन बोगावत सह अशोक शिंदे यांनी आपल्या मनोगत द्वारे पत्रकारांना शुभेच्छा दिल्या, अध्यक्ष भाषणामध्ये विनोद महांगडे यांनी शुभेच्छासह पत्रकारांना चांगल्या कामाची शाब्बासकी चे गौरव उद्धार काढले, कार्यक्रमाचे आयोजन भिगवण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब थोरात, ज्येष्ठ पत्रकार, विक्रम शेलार, भरत मल्लाव ,डॉ,काशिनाथ सोलंकर ,अमोल कांबळे ,नितीन चितळकर , तुषार हगारे सह भिगवण पत्रकार संघातील सदस्यांनी केले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन देवानंद शेलार गुरुजी यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *