महानगरपालिकेचे बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारा सह अपक्ष उमेदवारांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी मोठी पराकाष्टा करावी लागली आहे , यातच जागा वाटपावरून नाराज उमेदवाराची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान विविध पक्षासमोर उभे राहिले यातच राज्यातील २ ९ महानगर पालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीचे तब्बल ६५ उमेदवार बिनविरोधी निवडून आले असून , यात सर्वाधिक ४४ भाजपाचे आहेत . राज्यातील २ ९ महानगर पालिकेतील २ हजार ८६ ९ पदांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते . त्यापैकी ७ हजारांपेक्षा अधिकांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे . अर्ज माघारीनंतर राज्यातील तब्बल ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत . यात सर्वाधिक ४५ भाजपाचे असून , शिवसेनेचे १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ अहिल्यानगर मधून निवडून आले आहेत . भाजपाचे सर्वाधिक उमेदवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कल्याण – डोंबिवली क्षेत्रातून बिनविरोध निवडून आले आहेत .अहिल्यानगर , पनवेल , पुणे , जळगाव , धुळे आदी महापालिकांमाध्येदेखील महायुतीचे उमेदवार बिनविरोधी निवडून आले आहेत . नगर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला दारून पराभव स्वीकारावा लागला होता , यातच निवडणूक होण्याच्या अगोदरच महायुतीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी निवडणूक आयोगासह महायुतीच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप लावल्याने निवडणूक खूप मोठ्या रोमहर्षक स्थितीमध्ये होणार हे मात्र कोणी रोखू शकणार नाही, असे असले तरी महायुती मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे,,,