सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भुकंप! मा आ, यशवंत माने सह चार बडे नेते भाजपच्या वाटेवर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाचे सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार यशवंत माने सह चार मा आमदार भाजप पक्षांमध्ये लवकरच जाहीर प्रवेश होणार असल्याचे खुद्द माजी आमदार यशवंत माने यांनी बाबीर बुवा यांच्या यात्रेमध्ये जाहीर करून टाकले आहे, वास्तविक पाहता हा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला मानला जात असला तरी राज्याचे कृषिमंत्री मात्र या बाबतीत दत्ता भरणे जरी पक्षातून गेले तरी अजित पवार गटाला फरक पडणार नाही असे जाहीर बोलत आहेत, हे जरी खरे असले तरी एखादं छोटसं छिद्र अक्के मोठे जहाज बुडवू शकते हे वास्तवही कोणी नाकारू शकत नाही, खुद्द कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोलापूर दौरा केल्यानंतर हा प्रकार घडल्याने भरणे यांच्यावर प्रचंड नाराजी असल्याचे याद्वारे निदर्शनात येत आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती नुकतीच जाहीर झाले असून यामध्ये राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट या पक्षाला मोठा मध्ये धक्का बसू शकतो कारण माजी आमदार यशवंत माने यांचा मोहोळ सह सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदारसंघात फार मोठा दांडगा जनसंपर्क आहे , इंदापूर मध्ये शेळगाव या ठिकाणी राहणारे यशवंत माने यांचा इंदापूर मध्येही तळागाळातील जनतेमध्ये संपर्क असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला खूप मोठी त्यांची उणीव भासणार हे मात्र नक्कीच, एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले माने मोहळ चे आमदार म्हणून गेल्या टर्ममध्ये अत्यंत कुशल पणे काम करून पक्षाच्या वाढीसाठी प्रामाणिक काम केले यामुळे त्यांच्याप्रती सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा आदर आहे , मात्र पक्षासाठी एवढे प्रामाणिक काम करूनही त्यांच्यावर सतत अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे त्यातच विधान परिषद वर त्यांची वर्णी न लागल्याने इंदापूर सह मोहोळ व सोलापूर मध्येही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्ताव्यस्था निर्माण झाली होती , त्यातच कृषिमंत्री दत्ता भरणे ही त्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचे माने यांनी जाहीरपणे सांगितले आहे, जरी त्यांच्या जाण्याने फरक पडणार नाही असे म्हणले जात असले तरी मात्र पक्ष संघटनेवर याचा खूप मोठा परिणाम होईल हे सर्वसामान्य जनतेकडून बोलले जात आहे

