स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर उमेदवारी साठी नेत्यांमध्ये चुरस लागली आहे , एकंदरीत पाहता भिगवन शेटफळ गडे मतदारसंघातही खूप मोठी चुरस पहावया मिळणार आहे , कारण स्वप्निल बंडगर राहणार मदनवाडी उच्चशिक्षित इंजिनियर उद्योग, कंत्राटदार त्याचप्रमाणे समाजासाठी काही वेगळेच करण्यासाठी नव्या उमेदीने तरुण चेहरा म्हणून स्वप्निल बंडगर यांच्याकडे पाहण्यास मिळत आहे विविध उपक्रमाद्वारे आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे उमेदवार म्हणूनही आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांची ख्याती होऊ लागली आहे, यांनी समाज हिताच्या करता 21 ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी मानाची दहीहंडी जय हनुमान दहीहंडी उत्सव मदनवाडी चौकामध्ये आयोजित केली होती, त्याचप्रमाणे खास महिला वर्गांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम तीन ऑक्टोंबर रोजी वेंकटेश लॉन्स येथे आयोजित केला होता, तसेच तरुणाई करिता 25 ऑक्टोबर रोजी टेनिस बॉल वरील क्रिकेटचे सामने शेटफळ या ठिकाणी आयोजित केले होते, नक्कीच यांच्या या कार्यक्रमाने ते जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये या कार्यक्रमाद्वारे घरोघरी पोहोचून त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून नागरिक पाहत आहेत , नक्कीच त्यांच्या कामाची प्रचिती पाहता ते भिगवण शेटफळ गढे गणातून उमेदवारीसाठी इच्छुक असून जर मला उमेदवारीची संधी मिळाली तर त्या संधीच आपण सोनं करू हे त्यांनी आवर्जून सांगितले,