इंदापूरसंपादकीय

दिपावली सण उत्सवाचे महत्त्व ,,,,

Spread the love

दिवाळीचे पाच दिवस धनत्रयोदशी , नरकचतुर्दशी , लक्ष्मीपूजन , बलिप्रतिपदा ( पाडवा ) आणि भाऊबीज हे असून प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे . या उत्सवाचा उद्देश ‘ अंधारावर प्रकाशाचा विजय ‘ साजरा करणे हा आहे . धनत्रयोदशीला संपत्तीची खरेदी केली जाते , नरकचतुर्दशीला नरकासुराचा वध आणि लक्ष्मीपूजनात देवी लक्ष्मी केली जाते . पाडवा आणि बलिप्रतिपदेला बळीराजाच्या स्मरणात पती – पत्नीच्या नात्यातील प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जात भाऊबीज भावाबहिणीच्या नात्याचा सन्मान करते .
दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व :
धनत्रयोदशी : या दिवसाची सुरुवात होते आणि हा दिवस सोने , चांदी आणि भांडी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो , ज्यामुळे घरात समृद्धी येते .
नरकचतुर्दशी : या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला
मानले जाते . या दिवशी अभ्यंगस्नान करून वाईट शक्तींचा नाश होतो तेही मानले जाते .
लक्ष्मीपूजन : दिवाळीचा मुख्य दिवस , ज्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा जाते . घरात सुख – समृद्धी आणि भरभराट यावी यासाठी ही पूजा केली जाते .
बलिप्रतिपदा / पाडवा : या दिवशी भगवान विष्णूने वामनरूप घेऊन बळीराजाला पाताळात पाठवले होते . हा दिवस पती – पत्नीच्या नात्यात प्रेमाचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो .
भाऊबीजःदिवाळीचा शेवटचा दिवस . या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते . हे भावाबहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक आहे . अश्या या दिपावली सणाला महा २४ तास परिवाराकडून सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *