इंदापूर

पूर्ण देश दिवाळी सन जोमाने साजरा करीत असताना भिगवण पोलिसांची मात्र कर्तव्यदक्ष कामगिरी!

Spread the love

भिगवन पोलिसांची दमदार कामगिरी दीपावली सणाच्या अनुषंगाने सतर्क पेट्रोलिंग करीत असताना अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुस्क्या

१,००,००० / – किंमतीचा मुदद्माल केला हस्तगत …

भिगवन /प्रतिनिधी

खरं पाहायला गेलं तर संपूर्ण जनता कुठलेही सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात मात्र कुठलाही सण हा शांततेत साजरे करतात ते कोणामुळे तर ते नक्कीच पोलीस बांधवामुळे पोलीस आपल्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीने कुठल्याही सणाला गालबोट लागणार नाही याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करतात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क राहते याचीच प्रचिती भिगवन पोलीस स्टेशनच्या पोलीस मित्राकडून पाहावयास मिळाली आहे,
संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक सो , पुणे ग्रामीण यांनी दिपावली सनाचे अनुशंगाने पोलीस स्टेशनचे हददीत सतर्क पेट्रोलींग करून मालमत्तेविरूध्दचे गुन्हयांना प्रतिबंधक करण्याचे अनुशंगाने दिलेल्या सुचना प्रमाणे विनोद महांगडे प्रभारी अधिकारी , भिगवण पोलीस स्टेशन यांनी भिगवण पोलीस स्टेशनचे हदगीत दिनांक . 16 ऑक्टोंबर रोजी रोजी रात्रौ १ वा चे सुमारास मौजे अकोले गावचे हददीत पोलीस अंमलदार महेश उगले , सचिन पवार , संतोष मखरे , शहाजी सुद्रीक यांचेसह पेट्रोलींग करीत असताना एक इसम मोटार सायकल वरून संशईत रित्या फिरत असताना मिळुन आला . त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव गणेश गंगाधर टिंगरे , वय . ४४ वर्ष , रा . लोहार गल्ली , ता . कर्जत , जि . अहिल्यानगर , असे असल्याचे सांगितले . त्याचे ताब्यात मिळुन अलेल्या मोटार सायकल नंबर . एम.एच .२३ / बी.ई. ७३ ९ ५ बाबत अधिक चौकशी करता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला . तो समाधान कारक माहीती देत नव्हता . त्याने सदरची मोटार सायकल ही कोठुन तरी चोरी केल्याची खात्री झाली . त्यामुळे त्यांचेवर भिगवण पोलीस स्टेशन , गुन्हा दाखल करून त्यांचे ताब्यातुन ६०,००० / – रू किंमतीची स्लेंडर मोटार सायकल गुन्हयाचे पुराव्याकामी जप्त केली .
आरोपी नामे गणेश गंगाधर टिंगरे , वय . ४४ वर्ष , रा . लोहार गल्ली , ता . कर्जत , जि . अहिल्यानगर याचेकडे अधिक विचारपुस करीत असताना त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने दिनांक . 13 ऑक्टोंबर रोजी रोजी मौजे मदनवाडी गावचे हददीतुन मदनवाडी पुलाजवळुन एक पॅजो कंपनीवी रिक्षा नंबर . एम . एच . ४२ / बी . २७८३ ही चोरी केल्याची कबुली दिली . सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन , गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले . त्यामुळे त्यास संबंधीत गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन ४०,००० / – रू किंमतीची पॅजो कंपनीची रिक्षा नंबर . एम . एच . ४२ / बी . २७८३ ही गुन्हयाचे पुराव्याकानी जप्त केली आहे . तसेच आरोपी गणेश गंगाधर टिंगरे यांचे ताब्यात मिळुन आलेली मोटार सायकल नंबर . एम . एच . २३ / बी.ई . ७३ ९ ५ ही मिरजगाव येथुन चोरी केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असुन सदर बाबत मिरजगाव पोलीस स्टेशन , जि . अहिल्यानगर , गुन्हा दाखल असल्याचे निष्पन झाले . सदरची कामगिरी मा . संदीप सिंह गिल्ल सो , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक , बारामती विभाग , पुणे ग्रामीण , डॉ सुदर्शन राठोड , उपविभागीय पोलीस अधीकारी , बारामती विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे , सहा . पोलीस निरीक्षक , भिगवण पो.स्टेचे पोलीस अंमलदार महेश उगले , सचिन पवार , संतोष मखरे , शहाजी सुद्रीक यांनी केली आहे . एकंदरीत अशा कामगिरीमुळे समाजात पोलिसांची प्रतिमा नेहमीच उंचावलेले असेल जेणेकरून कुठलाही गुन्हा करताना कायद्याचा धाक हा गुन्हेगारांना असेल आशा या भिगवण पोलिसांच्या कामगिरीमुळे खरोखरच ग्रामस्थांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे त्याचप्रमाणे भिगवन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद महागडे व त्यांचे सहकारी हे नेहमीच कौतुकास्पद कामगिरी करीत असल्याने त्यांच्यावर शब्दरूपी कौतुकाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *