जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रियाचे बिगुल वाजल्यानंतर व आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याचे पहावयास मिळत आहे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद पंचायतचे समिती यांच्यासाठी एक एक उमेदवार देणे हे पक्षप्रमुखांना पुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे, यामध्ये पक्षामध्ये इन्कमिंग त्याचप्रमाणे नाराज पुढाऱ्यांना बरोबर घेणं हे खूप अवघड होणार असल्याचे दिसून येत आहे , भिगवण मतदार संघ हा खूप मोठा आहे या मतदारसंघांमध्ये आजूबाजूच्या वाड्या वस्ती, गाव यांचाही खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे एकंदरीत पाठीमागचा इतिहास पाहिला तर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार भिगवन परिसरातूनच दिले जातात, हे जरी खरे असले तरी आजूबाजूच्या गावामधूनही काही निष्ठावंत कार्यकर्ते यांना मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींना सतत डाव्वले जाते हे मात्र नक्कीच, सतत पक्षासोबत एकनिष्ठ राहून यांना कधी संधी मिळणार याची कुजबुज नागरिक आता करू लागले आहेत , तसं पाहायला गेलं तर यावेळेस मात्र खरंच नेतेमंडळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठेतरी त्यांना स्थान देतील का हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे, जर ठराविक गावातीलच लोकांना उमेदवारी मिळाली तर ह्या वेळेस मात्र आजूबाजूतील गावे एकत्र येऊन काही वेगळा निर्णय घेतील का ? जर असा निर्णय भिगवन व शेटफळ गडे गणामध्ये येणाऱ्या गावाने घेतला तर तर खूप मोठी अडचण येऊ शकते हे मात्र नक्कीच…