भिगवन मधील अंतर्गत रस्त्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतकडे साकडे
भिगवन /प्रतिनिधी
भिगवन सारख्या नवलौकिक शहरांमध्ये अंतर्गत रस्त्याची खूप मोठी समस्या वारंवार भेडसावत असलेले दिसून येत आहे
पद्मावती डेअरी ते मंगल दृष्टी सोसायटी जाणाऱ्या रस्त्याची. खूप मोठी दुर्दशा झाली असून पावसाळ्यामध्ये नागरिकांना ये जा करण्याकरता खूप मोठी कसरत करावी लागत आहे आहे तात्काळ
रस्त्याने दुरुस्ती करण्याबाबत स्थानिक रहिवासी विक्रम लांडगे यांनी वारंवार भिगवण ग्रामपंचायतला अर्ज दिला आहे
सदर अर्जाद्वारे , पद्मावती डेअरी ते मंगल दृष्टी सोसायटी जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे . पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होऊन वाहनांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण होतो . नागरिक , शालेय विद्यार्थी , महिला व वृद्ध व्यक्तींना ये – जा करणे फार कठीण झाले आहे . या रस्त्याबाबत पूर्वीही ग्रामपंचायतीकडे अर्ज करण्यात आले तसेच सोसायटीचे चेअरमन सदस्य यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडेही निवेदन दिले आहे . तरीसुद्धा अद्याप रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही म्हणून येथील रहिवासी यांनी मागणी केली आहे की , सदर रस्ता तातडीने डांबरी किंवा सिमेंट रस्ता करून द्यावा , जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल जर तातडीने कार्यवाही करण्यात आली नाही तर मंगल दृष्टी सोसायटीचे रहिवासी व ग्रामस्थ पुणे – सोलापूर हायवेवर रस्ता रोको आंदोलन करतील , याची नोंद घ्यावी . या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर व सामाजिक परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील . अशा स्वरूपाचा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला असून , ग्रामपंचायत इथपर्यंत प्रकरण जाऊ देणार नाही कारण ग्रामपंचायत लोकहिताचा निर्णय घेईल याची खात्री आहे असे येथील रहिवासी विक्रम लांडगे यांनी सांगितले,
