डॉ काशिनाथ सोलनकर यांनी राबवले कर्मवीरांच्या विचारांचे जागर
अभियाना मध्ये एक हजार किमी प्रवास व सहा हजार ग्रामस्थ व विद्यार्थ्यांपर्यंत नेले कर्मवीरांचे कार्य
भिगवण /प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एवढ्या मोठ्या संस्था अशाच उभा राहिलेला नसून त्याकरता खूप मोठा संघर्ष करावा लागला महात्मा ज्योतिराव फुले यांना प्रेरित होऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. मुलांच्या शिक्षणाचा वसा हाती घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची निर्मिती केली सर्व जाती धर्मातील मुलांसाठी शाळेचे दालन त्यांनी निर्माण केले तसेच गरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कमवा आणि शिका या तत्त्वावरती रयत शिक्षण संस्थेची निर्मिती केली होती जेणेकरून गरीब विद्यार्थी या द्वारे शिक्षण घेतील , याच त्यांच्या कार्याला कुठेतरी आपला छोटासा हातभार म्हणून डॉ काशिनाथ सोलंकर यांनी त्यांनी केलेल्या कार्याला उजळा किंवा त्यांनी केलेल्या त्यागातून एवढा मोठा शिक्षणाचे दालन उभा केलेल्या कार्याची प्रचिती म्हणून डॉ सोलंकर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर व्याख्याते डॉ काशिनाथ सोलनकर यांनी ‘ कर्मवीर विचारांचा जागर ‘ हे अभियान राबवले .
यांनी शिरूर तालुक्यातील कवठे यमाई , मलठण , बारामती तालुक्यातील मोरगाव , मुर्टी , पुरंदर तालुक्यातील निरा , सातारा जिल्ह्यातील पळशी ता . माण या विविध शाळांमधून आपल्या व्याख्यानाद्वारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचे वेगळेपण पटवून दिले . त्यांनी याकरिता एक हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून पाच ते सहा हजार विद्यार्थी व ग्रामस्थांपर्यंत कर्मवीरांचे कार्य व चरित्र पोहचविले .
‘ कर्मवीर विचारांचा जागर ‘ अभियानात त्यांनी विविध ठिकाणी जाऊन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी एन पवार , पुणे विभागाचे इन्स्पेक्टर संजय मोहिते , रयतचे माजी विद्यार्थी पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे , जनरल बॉडी सदस्य
लालासाहेब नलवडे , आर . व्ही.जगदाळे , अशोक जगदाळे , बी एस खाडे , मोरगावचे सरपंच पोपट तावरे , निलेश केदारी ,
माजी विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी , कवठे यमाईतील दानशूर व्यक्तिमत्व रितेश शहा , नीरा येथील लक्ष्मणराव चव्हाण , माजी बांधकाम सभापती
दत्तात्रय चव्हाण मलठण येथील विलासराव थोरात , आर टी ओ अधिकारी हर्षदा खारतोडे यांच्याशी सोलनकर यांनी सुसंवाद साधला .
आपल्याला मिळालेले मानधन व प्रवास खर्च त्याच विद्यालयाला देणगी स्वरूपात काशिनाथ सोलनकर यांनी दिल्याने विविध गावातील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष कौतुक केले . शेटफळगडे या ठिकाणी कार्यरत असलेले डॉ सोलंकर यांना शेटफळगडे येथील शाळेतील प्राचार्य सह गावातील स्थानिक शालेय शिक्षण समिती सदस्य अध्यक्ष यांचे या कार्याला मोठे सहकार्य लाभले तसेच त्यांनी आपण येथून पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य तसेच त्यांनी केलेल्या शिक्षणात एवढ्या मोठ्या क्रांतीमुळेच आमचे सारखे विद्यार्थी घडले असून मी येथून पुढे तळागाळातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून शिक्षणासाठी प्रेरित करणार असल्याचे आवर्जून सांगितले, त्यांच्या या अशा कार्याबद्दल लोकांकडून त्यांचे विशेष असे कौतुक होत आहे


