ताज्या बातम्या

अतिवृष्टी भागात कर्ज वसुली थांबणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Spread the love
मुंबई /प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून , शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे . ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे . त्याबाबत राज्य सरकार बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे , अशी माहिती बुधवारी दि . २४ राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यभर नुकसानग्रस्तांचे पंचनामे युद्धपातळीवरयावेळी ते म्हणाले की , जालना जिल्ह्यात तब्बल २ लाख ५४ हजार एकर क्षेत्र पिकांचे नुकसान झाले आहे . नांदेड जिल्हा सर्वाधिक नुकसानग्रस्त असून , अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत . सर्वत्र पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून , महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी स्वतः शेतावर जाऊन तपासणी करत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात २२१५ कोटी रुपये निधी जमा शेतकऱ्यांना कोणतेही फोटो काढून देण्याची गरज नाही , असेही त्यांनी स्पष्ट केले . तसेच राज्य सरकारने नुकसानीसाठी मदतीची प्रक्रिया गतीमान असून मंगळवारी ( दि .२३ ) शासनाकडून २२१५ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला आहे . दरम्यान अजूनही आकडेवारी वाढत आहे . त्या प्रमाणात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल . दिवाळीपूर्वी कोणतीही मदत थांबणार नाही , प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळेल , असे आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले . राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील यावेळी त्यांनी सांगितले की , मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः शेतकरी बांधवांची भेट घेऊन परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत . पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले .हेलीकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले नागरिकांची हेलीकॉप्टरच्या सहाय्याने सुटका ; एनडीआरएफ , लष्करी जवानांकडून मदतकार्यया संकट काळात शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठोतकऱ्यांवरील कर्जवसुली थांबवण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा
या संकट काळात शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांवरील कर्जवसुली थांबवण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार असून , पंचनाम्यांनंतरची मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे . त्यामुळे या संकट काळात शेतकरी एकटे नाहीत , शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे , असेही मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *