ताज्या बातम्या

लवकरात लवकर अनुसूचित जातीचे उपवर्गीय आरक्षण जाहीर करा आमदार अमित गोरखे 

Spread the love
पुणे /प्रतिनिधी 
आमदार अमित गोरखे यांनी मातंग समाजाच्या हिताच्या मागणीसाठी व अ ब क ड उपवर्गीकरण करण्याकरता वसा हातामध्ये घेऊन समाजासाठी अहो रात्र लढा देत आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त), उच्च न्यायालय, पाटणा यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीचा कालावधी १४ सप्टेंबर २०२५ रोजी संपुष्टात येत असल्याने मा आमदार अमित गोरखे यांनी नुकतीच मा मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती व पत्र दिले होते ,त्या नुसार या समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय खात्या मार्फत देण्यात आली आहे.
यावेळी माननीय आमदार अमित गोरखे यांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन अबकड उपवरगीकरण लवकरात लवकर जाहीर करावे यासंदर्भात सविस्तर चर्चा केली व या संदर्भातली सद्य परिस्थिती बदर समितीने आतापर्यंत केलेले काम याविषयीची माहिती माननीय मुख्यमंत्री यांना दिली.
या समितीस अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे, तथ्यांची छाननी करणे, उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे आणि त्यानुसार प्रारुप आराखडा शासनास सादर करण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *