पोंधवडी ते कोठारी फार्म रस्त्याची दुरावस्था


भिगवन / प्रतिनिधी
खऱ्या अर्थानं रस्ता म्हणजे दळणवळणाचे खूप मोठ्या प्रमाणावर साधन आहे, हे जरी वास्तव असले तरी त्या रस्त्याच्या देखरेख करण्यावर मात्र कुणाचेच लक्ष नाही हे वास्तव आहे, शासन खुप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून रस्ता उच्च प्रतीचे करीत आहेत, मात्र कंत्राटदार किंवा सदर कामावर नियंत्रण राहणारी यंत्रणा म्हणजेच पीडब्ल्यूडी खाते रस्ता दुरुस्ती बाबत गप्प का याचं कोड सर्व सामान्य नागरिकांना पडून राहिले आहे, कारण पोंधवडी, पिंपळे, कोठारी फार्म या गावांना जोडणाऱ्या रस्त्यामुळे दळणवळण साधन वाढले असून बारामतीला शॉर्टकट मार्गाचा भरपूर उपयोग होत आहे, याच उद्देशाने या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे, सदर कंत्राटदाराची रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असते मात्र पोंधवडी ते पिंपळे च्या वेशीवरती नागमोडी मोठे वळण असून त्या ठिकाणच्या रस्त्याच्या साईट पट्ट्या व रस्ता गेल्या महिन्यात आलेल्या मोठ्या आसमानी संकटांनी म्हणजेच पावसाने वाहून गेला आहे , पण जवळपास एक महिना उलटूनही सदर कंत्राटदार रस्त्याच्या कडेला साई पट्ट्या भरल्या नसून या ठिकाणी रात्री फार मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून सदर कंत्राटदार किंवा पीडब्ल्यूडी खाते माणसाच्या जीवावर खेळत आहे का असा फार मोठा ग्रामस्थांच्या मनामध्ये पडलेला संभ्रह आहे , या रस्त्याच्या कडेला कठाडे व रस्ता वाहून गेल्याने खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना रात्री कसरत करून वाहने चालवावे लागतात जर हा रस्ता ताबडतोब दुरुस्ती केला नाही तर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे म्हणून पीडब्ल्यूडी खाते व कंत्राधार यांनी वेळीच रस्त्याची दुरुस्ती करावी असे आव्हान ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

