मातंग समाज तथा पिंपरी चिंचवडच्या राजकीय इतिहासात प्रथमच विधान परिषद तालिकेवर सभापती म्हणून बसणारे पहिले युवा आमदार अमित गोरखे
पुणे / प्रतिनिधी
१ जुलै २०२५
मातंग समाज तथा पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय आज लिहिला गेला आहे. भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू, तरुण आणि लोकसंग्राही आमदार अमित गोरखे विधान परिषदेत प्रथमच तालिकेवर सभापती म्हणून बसले. अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व, पण ठाम विचार आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले गोरखे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून राज्यराजकारणात ओळखले जातात.
आज विधान परिषदेत तालिकेवर पिंपरी चिंचवड शहरातून व मातंग समाजातून प्रथमच बसण्याचा मान मिळाल्यावर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष आभार मानले
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “भारतीय जनता पक्ष हा नेहमीच तरुण, अभ्यासू, शिक्षित नेतृत्वाला संधी देतो. पिंपरी चिंचवडसारख्या उद्योगनगरीतील सामान्य नागरिक, छोट्या समाजघटकांचा आवाज विधानमंडळात पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भाजपने दिलेल्या विश्वासाला मी पूर्ण न्याय देईन.”
अमित गोरखे यांची ही नियुक्ती केवळ शहरासाठी नाही, तर समृद्ध महाराष्ट्रासाठी ,तमाम मातंग समाजासाठी उर्जावान नेतृत्वाची दिशा दर्शवणारी ठरेल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
त्यांच्या समाजाच्या इतिहासात ही पहिली घटना आहे,
तालिकेवर बसताना त्यांनी आपले स्वर्गीय वडील गणपतराव गोरखे याना स्मरण केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आशिर्वादाने च इथ पर्यत
पोहोचल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली,


