पोंधवडी गावचे उपसरपंच डॉ. तुळशिराम नारायण खारतोडे यांचा उपसरपंच पदाचा स्वखुशीने राजीनामा
भिगवण / प्रतिनिधी
पोंधवडी ग्रामपंचायत मध्ये विराजमान असलेले उपसरपंच डॉ तुळशीराम खारतोडे यांनी आपला राजीनामा. दिनांक 21 जून रोजी दिला होता . तो राजीनामा ,सरपंच सारिका शिंदे व ग्रामपंचायत अधिकारी रावसाहेब गवंड यांच्याकडे सुपूर्त केला.30 जून च्या मासिक सभेमध्ये राजीनामा मंजूर झाला यावेळी पोंधवडी गावचे मा सरपंच व श्री हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन नाना बंडगर, पोंधवडी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार, नवनाथ भोसले अर्चना बंडगर ,पद्मिनी कोकरे यावेळी उपस्थित होते .
त्यांनी जुले 2023 रोजी उपसरपंच पदावर विराजमान झाल्यापासून जवळपास गेली दोन वर्ष त्यांनी गावच्या विविध विकास कामांवर भर दिला पोंधवडी गावचे सरपंच पद पाठीमागील काळात रिक्त होते त्यावेळी त्यांनी सतरा महिने प्रभारी सरपंच म्हणून काम पाहिले. त्यावेळी त्यांनी गावातील रस्ते हायमस्ट दिवे जिल्हा परिषद शाळांना साहित्य व कलर मंदिर बांधकाम, सभामंडप सार्वजनिक ठिकाणी बसण्याची बाकडे, अंतर्गत गटर लाईन त्यांच्या कार्य काळामध्ये झाले आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात ओळख आहे. त्यांनी केलेल्या कामाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे, पाठीमागील काळा मध्ये त्यांनी जवळपास 76 कुटुंबांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे, त्यांनी. पोंधवडी तंटामुक्ती अध्यक्ष पदावर ही आठ वर्ष काम केले असून , श्री हनुमान वि विकास सोसायटीच्या संचालक पदावर ही सध्या ते विराजमान आहेत, त्यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी आवर्जून सांगितले की स्वखुशीने राजीनामा देत असून इतर ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळणे साठी राजीनामा देत असून येणाऱ्या काळामध्ये गावातील लोकांची सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व गावकऱ्यांनी सहकार्य केल्याने त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. येणाऱ्या काळामध्ये उपसरपंच पदाची माळ कुठल्या गटाकडे जाते याची सर्व ग्रामस्थांना कुतुहल लागल्याचे दिसून येत आहे.
