आषाढी एकादशी निमित्त धाकटे पंढरपूर येथे भक्तांची मांदियाळी
भिगवन प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैष्णवांचा मेळा भरला आहे याच पार्श्वभूमीवर
धाकटे पंढरपूर या ठिकाणी रुई गावच्या हद्दीमध्ये भिगवन सोलापूर हायवे नजदीक पळसदेव हद्दीच्या शेवट विठ्ठल रुक्मिणी यांचे धाकटे पंढरपूर या नावाने उदयास आलेले मंदिर या ठिकाणी असून आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे भक्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात व देवाचे मनोभावे दर्शन घेतात एकंदरीत या मंदिराचा इतिहास पाहिला तर डिकसळ येथील वारकरी ज्योतिबा जाधव हे पायवारी करत असत कालांतराने थकल्यानंतर त्यांनी शेवटची वारी करण्याचा निर्धार केला आणि शेवटच्या वारी ला जाण्यास निघाले यावेळी देवाने स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला व मी पाठीमागे आहे असे सांगितले यादरम्यान त्यांनी या ठिकाणी आल्यावरती पाठीमागे पाहिले असता देवाचा साक्षात्कार झाला व पंढरपूरचे विठ्ठल या ठिकाणी भक्तासाठी स्थायिक झाले. असे मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष हरिश्चंद्र माने व सचिव मोहन काळे यांनी सांगितले,
हे मंदिर पुणे सोलापूर हायवे पासून दोन ते तीन किलोमीटर वरती उंच डोंगरावरती असून या ठिकाणी आषाढी एकादशी च्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते . यावेळी पहाटे चार वाजता महापूजा व आरती अकोल्याचे दराडे महाराज व रुई येथील किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आली, या मंदिराच्या आजूबाजूस शेतकऱ्यांच्या जमिनी असून येथील शेतकरी उदार मनाने भक्तांसाठी आपल्या शेतात पार्किंग असो का खेळण्याचे साहित्य असो अगदी निस्वार्थपणे उभ्या पिकात जागा देतात तसेच स्थानिक शेतकरी विलास किसन काळे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता यांनी आवर्जून सांगितले की आमची जमीन मंदिरा लगद असून रस्ता स्व: त मालकीतून मंदिराकडे ये जा करण्यासाठी कायमस्वरूपी दिला असून भविष्यामध्ये मंदिराच्या प्राणांगणामध्ये भक्तांसाठी सुख सुविधांसाठी जर जागा कमी पडली तर स्वखुशीने मंदिरासाठी कायमस्वरूपी जागा देण्यासाठी ग्वाही दिली दिली,तसेच भक्तांसाठी ये जा करण्याकरिता फॉरेस्टच्या जागेतून यावे लागते सदरचा रस्ता खराब असल्याने वाहन चालवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते म्हणून शासनाने किंवा स्थानिक प्रतिनिधींनी तालुक्याच्या विशेष बाबीतून पक्क्या रस्त्याची सोय करण्याचे आव्हान शासन दरबारी केले
