लाकडी निंबोडी प्रस्ताविक पाण्याच्या योजनेतून पोंधवडी, पिंपळे तलावात आउटलेट सोडण्याची मागणी ,, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे
भिगवन/ प्रतिनिधी
खऱ्या अर्थाने देशाचा आर्थिक कणा मानला जाणाऱ्या शेतकरी वर्गांसाठी चालू स्थितीमध्ये पाण्याची खूप मोठी गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे परिणामी शेतकरी वर्ग चिंतेच्या छायाखाली आहे , याच गोष्टीला अनुसरून मा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या सहकार्यातून लाकडी निंबोडी पाण्याची योजना सुरू आहे या योजने तून पोंधवडी पिंपळे तलावात आउटलेट सोडण्याची मागणी छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर चे संचालक अनिल बागल व श्री हनुमान वि वि कार्यकारी सेवा,संस्था पोंधवडी चेअरमन नानासाहेब अर्जुन बंडगर यांनी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तामामा भरणे यांना विनंती केली व शेतकरी हितासाठी पोंधवडी पिंपळे तलावात पाण्याची आऊटलेट सोडले तर पोंधवडी पिंपळे मदनवाडी निरगुडे या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा शंभर टक्के फायदा होऊन शेतकरी राजा हा सर्व गुण संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही याच कारणांमुळे दत्तामामा भरणे यांनी ही मागणी आपल्या लेटर हेड वरती सादर करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना 22 एप्रिल रोजी मागणी केली आहे, खऱ्या अर्थाने शेतकरी हितासाठी ही मागणी मान्य झाले तर पुढील काळात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम दिवस येतील हे मात्र कोणीच नाकरू शकत नाही, खऱ्या अर्थाने शेतकरी हिताच्या साठी छत्रपती सहकारी कारखाना भवानीनगरचे संचालक अनिल बागल व हनुमान वि वि कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन नानासाहेब बंडगर यांनी केलेल्या या कामाचे आजूबाजूतील शेतकरी वर्गाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे,
