महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना 1 मे पासून खाकी युनिफॉर्म वापरण्यास परवानगी मिळणारश्री दत्तात्रेय प्रल्हाद अवघडे
मुंबई /प्रतिनिधी
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ.
(सलग्न भारतीय मजदूर संघ)
ठाणे जिल्हा अध्यक्ष/प्रदेश सचिव श्री दत्तात्रेय प्रल्हाद अवघडे यांनी दि.24 एप्रिल रोजी सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा, नवीमुंबई कार्यालय या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे कामगार उपायुक्त/अध्यक्ष श्री अशोक डोके साहेब यांची भेट घेऊन खाकी युनिफॉर्म विषयी चर्चा केली व खाकी युनिफॉर्म वापरण्यास लवकरात लवकर परवानगी द्यावी आणि मंडळाच्या ॲपवर तशी नोटीस उपलब्ध करावी असे सूचित करण्यात आले त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री डोके साहेब यांनी तात्काळ संबंधित अधिकारी युनिफॉर्म वाटपाचे नोटीस हे दि.25 एप्रिल रोजी मंडळाच्या अँप वर उपलब्ध करावे व 1 मे पासून सर्व सुरक्षारक्षकांना खाकी युनिफॉर्म वापरण्यास परवानगी देण्यात येईल अशी चर्चा करण्यात आली व मागील काही दिवसापूर्वी कामगार विभागाने काढलेल्या जीआर बद्दलही चर्चा करण्यात आली जीआर काढताना किंवा शासनाने सुरक्षा रक्षकांच्या माथाडी कायद्यात बदल करताना कुठल्याही संघटनांना विचारात न घेता केलेला कायदा हा चुकीचा आहे सर्व संघटनांची मिटिंग घेऊन त्यांची मते जाणून घेऊन तसा निर्णय शासनाने घेयाला पाहिजे होता म्हणून सुरक्षारक्षकांच्या भरतीची ,अट बारावी पास न ठेवता दहावी पास किंवा नापास किंवा पूर्वीची आठवी पास ही पात्रता ठेवावी अशी सूचना केली आहे कारण सुरक्षा रक्षक मंडळ हे कल्याणकारी मंडळ असल्याने व माथाडी कायद्याप्रमाणे मंडळाचे कामकाज चालत असल्याने बारावी पास ही पात्रता योग्य नसल्याने कामगार विभागाने ही अट मागे घेऊन पूर्वीची आठवी पास ही पात्रता ठेवावी असे मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक डोके साहेबांना पटवून सांगितले व लवकरात लवकर दोन दिवसात युनिफॉर्म वाटप चालू करण्यात येईल असे आश्वासन डोके साहेबांकडून मिळाले आहे.
यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांना 1 मे पासून खाकी युनिफॉर्म वापरण्यास परवानगी मिळणार आहे. अशा कामाची कौतुक सर्व सुरक्षा मंडळाकडून अवघडे यांचे होत आहे.
