मार्केट कमिटी इंदापुर येथे नवीन कांदा आडत दुकानाचे उद्घाटन
भिगवन/प्रतिनिधी
देशाचा पोशिंदा शेतकरी राजा हा नेहमीच आर्थिक संकटात सापडलेला असतो आपला पिकवलेला माल विकण्यासाठी नेहमीच चांगले मार्केट शोधत असतो ट्रान्सपोर्टचा खर्च असो किंवा जवळीक मार्केट असो याच गोष्टीला अनुसरून शेतकऱ्यांच्या हितासाठी इंदापूर मार्केट कमिटी नेहमीच अग्रेसर असते म्हणूनच
मुख्य बाजार इंदापूर येथे बुधवार दि. 9 एप्रिल-2025 रोजी श्री बालाजी ट्रेडर्स (श्री. प्रेम संतोष देशमुख) यांच्या नविन कांदा आडत दुकानाचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक मा.श्री. आप्पासाहेब जगदाळेजी यांच्या मार्गदर्शनाने बाजार समितीचे सभापती मा.श्री. तुषार(बाबा) जाधव व माजी सभापती तथा जेष्ठ संचालक मा.श्री. दत्तात्रय(आबा) फडतरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी, सह आडते ,व्यापारी उपस्थित होते. मार्केट कमिटी यांच्याकडून शेतकरी वर्गाला आव्हान करण्यात आले की जास्तीत जास्त शेतकर्यानी याचा फायदा घ्यावा जेणेकरून शेतकरी वर्गाला याचा लाभ होईल .कांदामार्केट इंदापूर. बुधवार दि.09/04/2025
प्रति क्विंटल दर रु. 700 ते 2200/ या दराने लिलाव झाला. त्याच प्रमाणे कांदा
लिलाव वार:- सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी होईल असे मार्केट कमिटी यांच्याकडून करण्यात आले.
