अतिक्रमण विरोधात भिगवन ग्रामपंचायत समोर तरुणाचे अमरण उपोषण
भिगवन /प्रतिनिधी
शहरी असो की ग्रामीण सध्या अतिक्रमणाचे वारेच वाहू लागले आहे याच गोष्टीला अनुसरून भिगवण येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज पालखी मार्गावर तसेच मारुती मंदिर, शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिका व संत रोहिदास महाराज मंदिराभोवती अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी अनिकेत भिसे रा भिगवन (दि. ७) पासून बेमुदत उपोषणास बसला आहे. भिगवन हे चारी तालुका मध्यवर्ती ठिकाण असल्याने बिगवन चे वैभव नक्कीच देखण्या स्वरूपाचा आहे मात्र सध्या स्थितीमध्ये भिगवन मध्ये अतिक्रमणाचा विळाखा खूप वाढला आहे याच कारणास्तव भिगवन चे वैभव जतन करण्यासाठी अनिकेत भिसे यांनी अतिक्रमणातून भिगवन मुक्त होणे करता संविधानिक रित्या न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे . हायस्कूल रोडवर कला महाविद्यालय, भैरवनाथ हायस्कूल, मारुती मंदिर, शाहू-फुले अभ्यासिका, संत रोहिदास महाराज मंदिर एकाच भागात आहेत.
मात्र, या सर्व भागांत चोहूबाजूने अतिक्रमण झाल्याचा आरोप भिसे यांनी
केला आहे. एवढे मोठे अतिक्रमण वाढले असले तरी ग्रामपंचायत मात्र हा
वाद पुनर्वसन विभागाबरोबर असल्याचे आपल्याला सांगत असले, तरी
सातबारा ग्रामपंचायतीच्या नावे आहे. त्यामुळे त्यांनी ही अतिक्रमणे
काढावीत, असे निवेदनात म्हटले आहे.ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी म्हणाले, अतिक्रमण सुरू होताच संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या
होत्या. तसेच, पुनर्वसन व तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता.
मात्र, कारवाई झाली नाही. आता सहा महिने उलटून गेल्याने कारवाईचा
अधिकार ग्रामपंचायतीला राहिला नाही. मात्र अतिक्रमण कोण हटवणार संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले तर अतिक्रमणाबाबत ठोस भूमिका कोण घेणार असे सर्वसामान्य नागरिकाकडून बोलले जात आहे
