भिगवन” पीडब्ल्यूडी” अधिकारी देतात कॉन्ट्रॅक्टरांना अभय!
भिगवन /प्रतिनिधी
पोंधवडी या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे, या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू असताना या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू होत असल्याचे तुपे यांना वारंवार सांगण्यात आले आहे , वास्तविक पाहता ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी बांधकामाचा फलक लावणे अनिवार्य असून वाहतुकीसाठीही काळजी घेण्याचे सदर कॉन्ट्रॅक्टर यांची जबाबदारी आहे, मात्र कॉन्ट्रॅक्टर मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे ,यालाच भिगवन चे पीडब्ल्यूडी अधिकारीही अभय देत असल्याचे दिसून येत आहे कारण होणाऱ्या, कामाची प्रत ही नियमबाह्य असून याची लेखी तक्रार ही भिगवन पीडब्ल्यूडी खात्याला तुपे यांना दिले असून यांची जबाबदारी आहे ,या ठिकाणी हजर राहून कामाची वर्गवारी तपासणी व सदर काम योग्य प्रकारे होत आहे की नाही हे तपासूनच कंत्राटदारांना काम सुरू करण्यास परवानगी देणे मात्र, भिगवन चे पीडब्ल्यूडी अधिकारी हे या ठिकाणी हजर न राहता सदर पुलाचे काम कामाची प्रत योग्य नसतानाही कंत्राटदार हे आपल्या मनमानीने सदर काम अशाच प्रकारे सुरू ठेवत आहे या गोष्टींना खरंच जबाबदार कोण असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे? याच पार्श्वभूमीवर सदर अधिकारी व कंत्राटदार यांना ही कोणाचा अभय आहे हे पाहणे गरजेचे आहे कारण एवढा विरोध असतानाही कंत्राटदार व सदर प्रशासकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, याच गोष्टीमुळे लेखी तक्रार द्वारे पीडब्ल्यूडी बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले व जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी, होणाऱ्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे यांच्याकडे तक्रार करणार येत असल्याने सांगितले आहे, खरोखरच हा जनतेचा पैसा असून याला काही अधिकारी व कंत्राटदार संगम मताने वाया घालत असल्याचे दिसून येत आहे कारण इतके दिवस होऊनही काम चुकीच्या पद्धतीने करणे व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणे हा अधिकार यांना आहे का? याचं आतापर्यंत पडलेलं कोड उलगडं अशक्य आहे. आता तरी प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून ,सदर कंत्राटदार व अधिकारी यात जर चुकीच्या प्रकारे काम करीत असेल तर कठोरात कठोर यांच्यावर कारवाई करावी असं नागरिकांकडून बोलले जात आहे, आणि सुरू असलेलं काम , संबंधित अधिकाऱ्याने इस्टिमेट प्रमाणे करून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे,

