दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिना निमित्त साकेत पोलीस ग्राउंड ठाणे या ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस व सुरक्षा रक्षक मंडळाच्या (महाराष्ट्र शासन स्थापित) सुरक्षा रक्षकांना विशेष कामगिरी बद्दल सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री श एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ ज शिंदे यांच्या हस्ते सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय प्रल्हाद अवघडे यांना कर्तव्यावर असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय प्रल्हाद अवघडे यांनी सुरक्षा रक्षक मंडळाचे उपआयुक्त अशोक डोके साहेब तसेच मंडळाचे सचिव गौरवकुमार नालिंदे तसेच मंडळाचे कर्मचारी निरीक्षक विजय खरोटे,श्रीमती कर्णिक , श् रोहित भोसले यांचे आभार मानले. कारण काम करणं आणि मनापासून काम करून आपल्या कामाची प्रचिती अशा थोर व्यक्तींच्या हस्ते मिळणे ही खरी कामाची पोचपावती, येथून पुढे अश्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करून व आपल्या कामाच्या प्रचितीने जास्तीत जास्त प्रमाणात गरजूंना न्याय देण्याचे प्रयत्न राहील असे दत्तात्रय अवघडे यांनी आवर्जून बोलताना सांगितले,