इतरपुणे

“उजनी लाभक्षेत्रात माती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

Spread the love

विशेष प्रतिनिधी/दौंड

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील वाटलूज, राजेगाव आणि खानोटा परिसरातील उजनी संपादित क्षेत्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर मातीची अवैध तस्करी सुरू आहे. भीमा नदीच्या खालावलेल्या पाणीपातळीचा फायदा घेत तस्कर रात्रं-दिवस या भागातून माती ओरबडत असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे महसूल आणि सिंचन विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे चित्र असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

भीमा नदीच्या तीरापर्यंत हे उजनी संपादित क्षेत्र विस्तारलेले आहे. वीटभट्टी व्यवसायासाठी या सुपीक मातीचा वापर केला जात असून, उत्खननासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर, ट्रक मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. नदीच्या अगदी जवळून माती उपसा केल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पात्राची दिशा बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती ओढवून शासकीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान होऊ शकते.

या तस्करीमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. माती उपसा सुरू असलेल्या ठिकाणी काही व्यक्ती हे क्षेत्र जणू आपल्याच मालकीचे असल्याच्या अविर्भावात ही व्यक्ती वावरत असून, विचारणा करणाऱ्यांना ‘आमचे कोणी काय करू शकत नाही आहे’ असे सांगून दिशाभूल करत आहे. . प्रशासनातील काही घटकांचे ‘आर्थिक लागेबंधे’ असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

हे क्षेत्र भीमा सिंचन शाखेच्या अंतर्गत येते, मात्र येथील कर्मचारी देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

हजारो ब्रास मातीची चोरी करून पर्यावरणाचा आणि महसुलाचा ऱ्हास करणाऱ्या या तस्करांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणचे पंचनामे करून अवैध उत्खनन थांबवावे आणि संबंधित ‘भामट्यांवर’ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महसूल विभाग गप्प का….

वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कर्मचारी यांच्यापर्यत या माती चोरीची आर्थिल देवाण घेवाण केल्याची चर्चाच या भागात जोरदार रंगली आहे.त्यामुळे नागरिकांनाचा महसूल विभागवरील विश्वासर्थ कमी झालेली पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *