इंदापूरवैशिष्ट्यीकृत

तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेला. सेवानिवृत्त आर्मी अधिकारी सुहास भनुदास धुमाळ  यांच्यावतीने अडीच लाखांचा एआय डिजिटल स्मार्ट पॅनल भेट,!

Spread the love
भिगवण प्रतिनिधी : मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधुनिक व डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तक्रारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सेवानिवृत्त आर्मी अधिकारी सुहास भानुदास धुमाळ व धुमाळ परिवाराच्या वतीने सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे Cybernetyx AI Digital Interactive Smart Panel सप्रेम भेट देण्यात आले.
५ ऑक्टोबर २०२६ रोजी मारुती मंदिर, तक्रारवाडी येथे या डिजिटल पॅनल प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, या भावनेतून धुमाळ परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सुहास भानुदास धुमाळ, रत्नमाला सुहास धुमाळ, सुशील सुहास धुमाळ, श्वेता सुहास धुमाळ देणगी धारक कुटुंब उपस्थित होते  उपक्रमाचे आयोजक अमर सुरेंद्रकुमार धुमाळ, पोलीस पाटील तक्रारवाडी यांच्यावतीने करण्यात आले
कार्यक्रमास सरपंच शरद वाघ, ग्रामपंचायत सदस्य सतीश वाघ, नितीन कळंगे, अविनाश धुमाळ, स्वातंत्र्यसैनिक मारुती धुमाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयदीप जाधव, सदस्य विलास गडकर, माऊली जगदाळे, गणेश जाधव, रणवीर टकले (पुणे अकादमी पोलीस भरती संचालक), मुख्याध्यापक राजेश नाचण यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून विविध विषयांचे अधिक प्रभावी व सुलभ शिक्षण मिळण्यास या स्मार्ट पॅनलचा उपयोग होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ व शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले.
खऱ्या अर्थाने पैसा जवळ असणे महत्त्वाचे नाही तर तो कुठल्या कामी जातो हेही तितकंच महत्त्वाचा आहे याच ज्वलंत उदाहरण म्हटलं तर निवृत्त अधिकारी मेजर धुमाळ यांच्याकडे खूप काही घेण्या योग्य आहे , कारण त्यांनी जो समाजापुढे आदर्श ठेवला आहे हा खूप मोठा आहे आणि याच प्रकारे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मराठी शाळा व ज्या ठिकाणी गरज आहे या ठिकाणी मदत केली पाहिजे , नक्कीच यांनी केलेल्या कामाचं कौतुक कराव एवढं कमीच आहे यांच्याशी संवाद साधला असता आपण काहीच केले नाही आम्ही समाजाचे काहीतरी देणे करी लागतो या भावनेतून मी केलेला छोटा प्रयत्न असे त्यांनी सांगितले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश शिंदे  यांनी केले. तर आभार प्रदर्शन तक्रारवाडी गावचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *