इतरइंदापूर

पुणे सोलापूर महामार्गावर ,’महामार्ग पोलिसांकडून’ वाहनधारकांची, आर्थिक लूट!!

Spread the love

भिगवन /प्रतिनिधी 

पुणे सोलापूर महामार्गावर डाळच या ठिकाणी महामार्ग पोलीस चौकी आहे, वास्तविक पाहता या चौकीतून तेथील कर्मचारी , वाहनांच्या वेग मर्यादा असो किंवा महामार्गावर चालणाऱ्या वाहनाचा नियमांचे उल्लंघन असो किंवा अवैधरित्या वाहन परवानाधारक किंवा चुकीच्या पद्धतीने मालवाहतूक असो अशा विविध स्वरूपाच्या घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस हे कटिबद्ध असतात,

मात्र येथील महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली झालेली पाहावयास मिळते उलट चित्र निर्माण झालेले आहे, शासनाने वेगवेगळे जीआर किंवा धोरणे अवलंबून असले तरी तीव्र उतार किंवा तीव्र चढ अशा ठिकाणी सदर कर्मचारी आपला तापा उभा करतात व वाहनधारकांकडून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण पहावयास मिळत आहे अशी तीव्र स्वरूपात तक्रार नागरिकाकडून वारंवार पाहावयास मिळत आहे, या ठिकाणी वाहनधारकांना खूप मोठ्या रक्षकांचा भक्षकाप्रमाणे त्रास सहन करावा लागतो, ठराविक वारांसह मंगळवार, शनिवार रविवार, या वेळी जोरदार वसुली राजरोजपणे सुरू असते, पन्नास रुपये, शंभर रुपये ,दोनशे रुपये, आशा स्वरूपात वसुली होते, वास्तविक पाहता कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे , नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडही बसविला पाहिजे मात्र तो कायद्याच्या चौकटीतूनच व्हायला पाहिजे मात्र या ठिकाणी चोर सोडून संन्यासालाच फासावर बसवत आहेत, कारण मोठ मोठे वाहनधारक ऐवद्यरित्या, राजरोजपणे मुक्त संचार करतात मात्र चिरीमिरी लहान वाहनधारकांना या गोष्टीचा त्रास होत असल्याने छोटे लहान मोठे व्यवसायिक वाहनधारक, प्रवासी यांच्याकडून तीव्र स्वरूपात महामार्ग पोलिसांवर नाराजी व्यक्त होत आहे, या गोष्टीची प्रशासनातील उच्च अधिकार्‍याने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, जेणेकरून या अवैधरित्या चुकीच्या मार्गाने पैसा कमवत असलेल्या अधिकाऱ्यांवर, कुठेतरी कायद्याची जरब बसून कारभार हा पारदर्शक होऊन सदर खात्याचे नाव उंचावेल अशी कामगिरी करावे असे नागरिकाकडून बोलले जात आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *