इंदापूरसंस्कृती

भिगवन येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवली वारी!

Spread the love

भिगवण /प्रतिनिधी 

– भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाल वारकऱ्यांचा वृक्ष दिंडी व पालखी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे,माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव, संचालिका मालन खानावरे , शिवराणी खानावरे, संचालक धनाजी थोरात, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुलभा सुकाळे, शामल भोसले,मुख्याध्यापिका सुचिता साळुंके,पल्लवी वाघ यांचेसह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध संतांच्या वेशभूषा पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *