पत्रकार म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व : विनोद महांगडे
भिगवण : प्रतिनिधी
भिगवन येथे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, येथे भिगवन पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन केले गेले होते यानिमित्त भिगवन व भिगवण पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते विशेषतः भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,
पत्रकार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून प्रशासनातील योग्य- अयोग्य गोष्टी दाखवून देण्याचे नि:पक्षपातीपणे काम ते करत असतात. त्यांच्यामुळे प्रशासनातील त्रुटी सुधारण्यास वाव मिळतो. असे मत भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महाऺगडे यांनी पत्रकार दिनानिमित्त भिगवण पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना अशोक शिंदे व सचिन बोगावत यांनी भिगवण येथील सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक करत ज्येष्ठ पत्रकार भरत मल्लाव यांनी गेले 30 वर्ष भिगवण येथे केलेल्या निर्भीड व वास्तववादी लिखाणाचे विशेष कौतुक केले.यावेळी मा.जि.प. सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच गुरप्पा पवार, उपसरपंच कपिल भाकरे, कर्मयोगी कारखान्याचे संचालक पराग जाधव, प्रशांत शेलार, संजय देहाडे, मा रोटरी क्लब अध्यक्ष संतोष सवाणे प्रदीप वाकसे,संपत बंडगर, स्वप्निल बंडगर, वंदना शेलार, सोनाली बंडगर, भिगवण पत्रकार संघाचे संस्थापक दादासाहेब थोरात, अध्यक्ष विजयकुमार गायकवाड, उपाध्यक्ष महादेव बंडगर,तुषार हगारे, कार्याध्यक्ष अमोल कांबळे,सचिव तुकाराम पवार, खजिनदार प्रवीण वाघमोडे रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार नितीन चितळकर यांनी भिगवण पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली सूत्रसंचालन निलेश गायकवाड प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार डॉ. काशिनाथ सोलंनकर यांनी केले तर आभार देवानंद शेलार यांनी मानले.

