भिगवन बारामती रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी
भिगवन पोलीस व परिवहन विभाग अपघात रोखण्यासाठी सज्ज!
भिगवण /प्रतिनिधी
एकंदरीत पाहावयास गेलं तर अपघाताच्या दुर्घटना घडलेल्या घटना वारंवार प्रसारमाध्यमावर वारंवार जरी येत असल्या तरी यातून निष्पन्न काहीच होत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे कारण ऊस वाहतूक सुरू झाल्यावर कितीतरी निष्पाप नागरिकांना या त्रासाला सामोरे जाऊन नाहक बळी जाण्याचे प्रमाण काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे यावर नक्कीच ठोस अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे जेणेकरून पुन्हा एकदा एखादा निष्पाप नागरिकांचा या अपघातामध्ये बळी जाता कामा नये ,
भिगवण बारामती मार्गांवर निरगुडे पाटीजवळ दिनांक 13 नोव्हेंबर रात्री 7. 50 वाजता उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ट्रॉलीचा आणि दुचाकी स्वाराचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उस वाहतूकीच हा 6 वा बळी असून अजून किती बळी गेल्यावर अपघात थांबणार ही विचार करण्याची गोष्ट आहे,
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष नारायण हिरवे वय 51 रा. तांदूळवाडी बारामती यांचा या अपघातात मृत्यू झाला. हिरवे हे कल्याणी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.भिगवण बाजूने बारामती बाजूला जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या खांद्याच्या उजवी बाजूमध्ये उस अथवा लोखंडी रॉड घुसल्याने गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. यात त्यांची बरगडी तुटल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे . यावेळी भिगवण येथील त्यांना तातडीने उपचारासाठी तक्रारवाडी येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचाराअगोदरच त्यांनी आपले प्राण गमावले होते. अपघात घडल्यावर ट्रॅक्टर ड्रायव्हर हा अपघात स्थळापासून पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उस वाहतूकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून कारखाना प्रशासन तसेच परिवहन विभाग अनेक उपाय योजना राबवीत असताना आणि भिगवण पोलीस तसेच महामार्ग पोलीस रोज कारवाया तसेच जनजागृती करत असताना अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.
अपघाताची खबर घेण्याचे काम भिगवण पोलीस रात्री उशिरा पर्यंत करत होते.शववीच्छेदन करण्यासाठी मृतदेह भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करणार आहेत. तपास होईल यातून काही निष्पन्न ही होईल मात्र बळी गेलेल्या नागरिकांचा जीव परत येणार नाहीत याकरता प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन अशा बेजबाबदार चालवणाऱ्या वाहनधारकावर कोठोरी कारवाई करण्याची गरज असल्याचे सर्व सामान्य नागरिकाकडून बोलले जात आहे,

