ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू
भिगवन / प्रतिनिधी
ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे , अनेक निष्पाप नागरिकांचा अपघातामध्ये बळी जात आहे , याच गोष्टीची पुनरावृत्ती भयानक पहावयास मिळाली
भिगवण बारामती रस्त्यावर पिंपळे ( ता . इंदापूर ) येथे शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रक यांच्या दरम्यान भीषण अपघात झाला . अपघातानंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीमध्ये ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे . भिगवण – बारामती रस्त्यावरील ऊस वाहतूक करत असलेल्या वाहनांचे अपघाताचे सत्र थांबत नसून चालू हंगामातील हा तिसरा बळी ठरला आहे . प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे . अमोल राजू कुराडे ( रा . नातेपुते , ता . माळशिरस , जि . सोलापूर ) असे अपघातामध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे . भिगवण – बारामती रस्त्यावर शनिवारी साडेदहाच्या वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टर व ट्रक ( क्र . एम.एच. ११ ए . एल . १३४१ ) यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला . अपघातामध्ये ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन इंधनाची टाकी फुटल्याने स्फोट होऊन दोन्ही वाहनांना आग लागली . येथील भिगवण पोलिस ठाण्याचे
सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी तातडीने फायर ब्रिगेडशी संपर्क केला. बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड भिगवन बिल्ट कंपनीची आणि बारामती ऍग्रो कंपनीची अशा फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घटनास्थळी तातडीने हजर झाल्या होत्या त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र अशा होणाऱ्या घटनेला कायमस्वरूपी चाप बसण्याकरता शासनाने चुकीच्या मार्गाने मालवाहतूक करण्याचा वाहनांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे असे नागरिकाकडून बोलले जात आहे जेणेकरून कुठल्या निष्पाप नागरिकांना याचे शिकार होता कामा नये

