इतरइंदापूर

भिगवण पोलीस स्टेशन मार्फत सायबर सिक्युरिटी अवेअरनेस जनजागृती उपक्रम भिगवन येथे  संपन्न!

Spread the love

भिगवन/ प्रतिनिधी

एकंदरीत पाहिला गेलं तर नेटवर्कमुळे संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेले आहेत तसेच नेटवर्कमुळे व्यवसाय किंवा उद्योग यालाही चालना भेटली तरी याच गोष्टीचा दुरुपयोगी मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले , ऑनलाइन पैशाला गंडा मोठ्या प्रमाणात ग्राहकांना , नागरिकांना होत आहे परिणामी बँकिंग किंवा ऑनलाईन वरती चांगल्या कामावरही याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे, याच गोष्टीची जनतेची फसवणूक होऊ नये या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे ऑक्टोबर २०२५ हा महिना सायबर सिक्युरिटी अवेअरनेस मंथ २०२५ म्हणून साजरा करण्यात येत आहे . या उपक्रमाचा एक भाग म्हणून भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी सायबर गुन्हे प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाअंतर्गत भैरवनाथ महाविद्यालय ,
थोरात हायस्कूल तसेच मौजे भिगवण गावातील एस.टी. स्टॅण्ड व मार्केट परिसरात जनजागृती करण्यात आली . नागरिक , विद्यार्थी व व्यापारी वर्गाला सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी , काळजी व सुरक्षित व्यवहाराचे मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमादरम्यान सायबर हेल्पलाईन क्रमांक १ ९ ३० व १ ९ ४५ याबाबत माहिती देण्यात आली . तसेच आर्थिक फसवणूक ,
सोशल मीडियाद्वारे महिलांविषयी घडणारे गुन्हे , अशा विविध सायबर अपराधांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.हा उपक्रम सहा . पोलीस निरीक्षक विनोद महागडे व यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला . त्यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहण्याचे व कोणताही गुन्हा घडल्यास तत्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले . या कार्यक्रमादरम्यान जनजागृतीसाठी भिगवन पोलीस स्टेशनचे पीएसआय वारगड सह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *