पोंधवडी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाची आपल्या वाढदिवसा दिनी विद्यार्थ्यांसाठी अनोखी भेट
भिगवन / प्रतिनिधी
खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करणे हे एक ट्रेंड होऊन बसले आहे मात्र पोंधवडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक सर्जेराव घोळवे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारा सुप्त उपक्रमा द्वारे त्यांनी समाजामध्ये छान संदेश दिला आहे, त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, पॅड, वही, अंकल्पी, सह अल्फोहाराचे आयोजन स्वखर्चाने 21 जून शनिवार रोजी केले होते, या कार्यक्रमाप्रसंगी पोंधवडी गावचे प्रथम नागरिक सरपंच हनुमान शिंदे, उपसरपंच डॉ तुळशीराम खारतोडे, श्री हनुमान सोसायटीचे चेअरमन नाना बंडगर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तुकाराम पवार, आबा साळुंखे, दादा आटोळे, उमेश शिंदे, इंदापूर शिक्षण पद संस्थेचे चेअरमन सतीश दराडे, पालक विशाल बंडगर, सचिन मलगुंडे दत्तात्रय हरिभाऊ पवार, उपस्थित होते, यावेळी सर्व शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक घोळवे गुरुजी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊनसन्मान करण्यात आला,कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक घोळवे सर, अवघडे सर खाडे सर आत्तार मॅडम सोनवणे मॅडम यांनी केले होते, यावेळी समस्त मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक वृंदांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते मुलांना शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले, त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त डॉक्टर खारतोडे तुकाराम पवार सतीश दराडे ,शिक्षिका सोनवणे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढल्याने सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक करून शाब्बासकीची थाप पाठीवरती टाकून येणाऱ्या काळामध्येश शिक्षकांकडून मुलांप्रती अपेक्षा वाढल्याचे आवर्जून सांगितले, शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव घोळवे यांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून नमूद केले की जेव्हापासून शिक्षक पेशा धारण केला आहे तेव्हापासून आजपर्यंत ही सेवा चालू ठेवलेली असून पुढील काळातही आपला वाढदिवस अशाच स्वरूपात साजरा करण्याचे मानस त्यांनी बोलून दाखवला व विद्यार्थी हेच माझे विठ्ठल असून त्यांची सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले व आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालक वर्गाचे विशेष आभार मानले, अशा समाज उपयोगी स्तुक्त उपक्रमाचे पोंधवडीसह आसपास गावातील नागरिकांकडून मुख्याध्यापक घोळवे गुरुजी यांचे विशेष कौतुक होत आहे , तसेच येणाऱ्या काळामध्ये दानशूर व्यक्तीने आपले वाढदिवस अशाच प्रकारे साजरा करून जिल्हा परिषदेतील शाळेमधील विद्यार्थ्यांना सहकार्य करून जिल्हा परिषदेतील शाळा उंचा वरती नेण्याचा प्रयत्न करावा असाच संदेश या उपक्रमांमधून व्हावा,….
