साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्जासाठी टाकण्यात आलेल्या जाचक अटी होणार रद्दआमदार अमित गोरखे
पुणे/प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत मातंग समाजासह तत्सम 12 पोट जातींचा आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने विविध योजना कर्ज योजनेअंतर्गत राबवून दारिद्र रेषेच्या वर आणणे हा महामंडळाचा उद्देश असून कर्ज मंजुरीनंतर कर्ज वितरणापूर्वी दोन अटी टाकण्यात आलेल्या असून त्यामध्ये एक अट सरकारी नोकरदार त्यांच्या कार्यालयाकडील विभाग कार्यालय प्रमुखाचे वसुलीसाठी हमीपत्र देण्यात यावे. दुसरी अट मालमत्ता धारक जमीनदारांच्या मालमत्तेवर महामंडळाच्या कर्जाचा बोजा नोंद करावा अशा दोन अटी टाकण्यात आलेल्या असून याअटीमध्ये बदल करुन या दोन्ही अटी शिथिल करून सदर कर्ज हे सदर लाभार्थ्याच्या नावाने त्याच्या मालमत्तेवरती बोजा म्हणून चढवण्यात यावे
याबाबत हिवाळी अधिवेशन 2024 पासून शासनाकडे
आमदार अमित गोरखे सातत्याने पाठपुरावा करीत होते,वेळोवेळी पत्र व्यवहार देखील केलेले आहेत राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सदर विषयाची दखल घेऊन तात्काळ हा विषय येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये सादर करण्याच्या सूचना विभागाला देऊन सदर जाचक अटी रद्द करण्याला हिरवा कंदील दिला असून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सदर निर्णय हा नक्कीच रद्द होणार आहे यामुळे संपूर्ण मातंग समाजाला एक नवी दिशा मिळून नवउद्योजक निर्माण होतील यातील मात्र शंका नाही. असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले
“
