मदनवाडी- पोंधवडी जोडणारा पुल शेतकंऱ्या सह नागरिकांसाठी होतोय धोकादायक
भिगवन/प्रतिनिधी
मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने रूद्रावतार धारण केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना फार मोठ्या आसमानी संकटाला सामोरे जावे लागले होते, कारण अतिवृष्टीमुळे मदनवाडी पोंधवडी जोडणारा पुल पाण्यामध्ये वाहून गेल्याने शेतकऱ्यांसह नागरिक शाळकरी विद्यार्थी यांना ये जा करीना करता रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे , प्रशासन दहा-बारा दिवस होऊन गेले तरीही अद्याप या पुलाजवळ फिरकलेले दिसत नाहीत वास्तविक पाहता अगोदर पोंधवडी मदनवाडी सह आसपासतील गावांना मुख्य बाजारपेठेमध्ये जाण्याकरता महामार्गावरून जाण्यास रस्ता होता मात्र अर्ध्या स्वरूपाचा रस्ता बांधल्याने तेथून कसेबसे नागरिक मुख्य बाजारपेठेकडे ये जा करीत असतात त्याही गोष्टीला आत्ता खिळ पडलेली आहे, भिगवन व भिगवन परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याची पाहणी करीन्या करिता कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली होती त्यावेळेस संबंधित खात्याला लवकरात लवकर गरजेच्या ठिकाणी रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या , मात्र संबंधित पीडब्ल्यूडी खाते यांनी त्यांच्या सूचनाला केराची टोपली दाखवलेली दिसून येते, महाराष्ट्र शासन करोडो रुपये खर्च करून रस्ता चांगल्या प्रतीचे करून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत असते मात्र पोंधवडी ते मदनवाडी हा रस्ता बांधत असताना पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण पुल वाहून जातो , संरक्षण कट्टे पडतात , या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे , वास्तविक पाहता या पुलाच्या ठिकाणी पुलाची उंची वाढवणे गरजेचे असून एम एस ई बी यांच्या लाईटच्या तारा देखील खूप खाली असल्याने शेतकऱ्यांसाठी एखाद्या वाहनांमध्ये खते आणायचे म्हटलं तर तारा ट्रॅक्टरला लागतील , यदा कदाचित एखाद्याच्या जीवावर हा प्रसंग ओढला या गोष्टीला जबाबदार कोण, रस्त्याच्या मध्यंतरीच एम एस सी बी चा खांब उभा आहे रात्री अपरात्री याही ठिकाणी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे वास्तव कुणीच नाकरू शकत नाही, चालू स्थितीमध्ये मदनवाडी ते पोंधवडी यांच्या दरम्यान रस्त्याचे काम अर्ध्या स्वरूपाचे झाले असून अर्ध्या रस्त्यातून चिखलातून मार्ग काढून कसेबसे नागरिक दळणवळण साधना करता मुख्य बाजारपेठेमध्ये जातात, राहिलेला अर्धा रस्ता कधी पूर्ण होणार याची कार्यमीमांसा संबंधित अधिकारी वर्गाने करणे गरजेचे आहे, संबंधित शेतकरी किरण मलगुंडे यांच्याशी वार्तालाप केले असता यांनी सांगितले की रस्त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग यांची गैरसोय होते तसेच येण्या जाण्याचा मार्ग खुंटल्याने शेतीच्या उत्पन्नामध्येही बऱ्याच प्रमाणात घट होत असल्याचे आवर्जून सांगितले, यामुळे लवकरात लवकर रस्ता होण्याची गरज असल्याचे त्यांच्यासह इतर शेतकऱ्यावर्गांनी सांगितले, पीडब्ल्यूडी अधिकारी सुर्वे यांच्याशी भ्रमणध्वनी केले असता यांनी मंगळवारी या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून शासनाच्या नियमाप्रमाणे मोजमाप करून रस्ता लवकरात लवकर सुरू होण्याची ग्वाही दिली, मात्र गेले अनेक दिवस अशाच स्वरूपाचे उत्तर मिळत असल्याने ह्यावेळेस नक्कीच काही ना काही होईल या आशेवरती नागरिक तक धरून बसले आहेत
