बेकायदेशीर अटकेप्रकरणी अदनान शेखला जामीन मंजूर
राजेगाव /प्रतिनिधी
इंदापूर ता. दौंड येथे बेकायदेशीर अटकेप्रकरणी आरोपी अदनान शेख याला इंदापूर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मा. पाटील साहेब यांनी जामीन मंजूर केला आहे. भवानीनगर येथे 31 मार्च 2025 रोजी कोयत्याने डोक्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात आरोपी अदनान शेख याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र अटक करताना भारतीय राज्य घटनेतील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता बेकायदेशीररित्या ही अटक करण्यात आली, असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. भार्गव पाटसकर व अॅड. रोहित लोणकर यांनी न्यायालयात केला.
या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने प्रकरणाचे बारकाईने परीक्षण केले असता, पोलिसांनी अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, न्यायालयाने आरोपी अदनान शेख याला जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
