ताज्या बातम्या

अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर गुन्हा दाखल, आमदार अमित गोरखे

Spread the love

 

पुणे /प्रतिनिधी

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक भिसे यांच्या पत्नीचे हॉस्पिटलच्या निष्काळजी मुळे मृत्यू झाला होता या कारणास्तव सर्वसामान्य नागरिक ग्रामस्थ यांच्याकडून हॉस्पिटल वर खूप मोठा प्रमाणात ताशेरे ओढले गेले होते वास्तविक पाहता मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध असतो मात्र खुद्द आमदारांचा, मुख्यमंत्री सहायता निधीचा हॉस्पिटलला फोन गेल्यावर ही हॉस्पिटल ने पेशंटला पैसा अभावी ऍडमिट न करून घेतल्या कारणास्तव पेशंटचा मृत्यू झाला हे वास्तव कोणीच नाकारू शकत नाही , मात्र आमदार अमित गोरखे यांनी हे प्रकरण लावून धरल्याने , या हॉस्पिटल वरती ससून हॉस्पिटल मधील डॉक्टरांची समिती चौकशी बसवली होती , या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात अहवाल दिल्याने हॉस्पिटलचे पाय आणखी खोलात गेल्याचे दिसून आले. आमदार गोरखे यांच्या पाठपुरावामुळे अखिल प्रशासनाने हॉस्पिटल वरती दोशींवर एफ आय आर दाखल केला , जेणेकरून इथून पुढे हॉस्पिटल आपला मनमानी कारभार करणार नाहीत कायद्याची वचक त्यांच्यावर राहील, मात्र हॉस्पिटल किती मोठे असो एखाद्या जीवाशी खेळण्याचा अधिकार हॉस्पिटल व हॉस्पिटल मधील प्रशासनांना नक्कीच नाही . याच गोष्टीची खुद्द आमदार अमित गोरखे यांनी दखल घेऊन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे प्रकरण हाताळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री यांच्या समवेत भिसे कुटुंबांना न्याय मिळवून दिला हे मात्र नक्कीच. तसेच येथून पुढे अन्यायाविरुद्ध गोरगरिबांसाठी न्याय देण्याकरता प्रामाणिकपणे काम करेल अशी ग्वाही आमदार अमित गोरखे यांनी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *