पोंधवडी येथे पाच एप्रिल पासुन अखंड हरीनाम सप्ताहला सुरवात
भिगवण /तुकाराम पवार
साधुसंत येती घरा तोची दिवाळी आणि दसरा या उक्ती प्रमाणे पोंधवडी ता .इंदापूर या ठिकाणी श्री हनुमान जयंती महोत्सव निमित्त अखंड हरीनाम सप्ताह आयोजन केले आहे.माणसाचे आचार विचार सुधरायचे असेन तर चांगले विचार मनी जोपासले पाहिजे मात्र चालू परिस्थिती मनुष्य आपले धावपळीच्या जीवनामध्ये जगण्याचा मर्म विसरला आहे याच गोष्ठीला अनुसरून गेली तीन वर्ष साधू संतांचे विचार श्रवण करून कोठेतरी समाज गाव गुण्या गोविंदाने नांदावा हाच खरा हेतू,सालाबादप्रमाणे यंदा श्री हनुमान जयंती महोत्सव निमित्त ५ एप्रिल २०२५ ते ११ एप्रिल २०२५ पर्यंत अखंड हरीनाम सप्ताह सुरु होणार आहे .या मध्ये अखंड विना ,पहाटे ४ते ६ काकडा ,सकाळी ९ ते १२. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन साय ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ७ ते ९ सात दिवस कीर्तनकार यांचे कीर्तन सेवा होईल या नंतर महाप्रसाद होईल .शनिवार दि १२/४/२०२५ रोजी हभ प अजिनाथ महाराज निकम (नेवासा )यांचे १० ते १२ काल्यचे किर्तन होईन तद्नंतर महाप्रसाद होईन .कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान वि का से सो चेरमन नानासहेब अर्जुन बंडगर , पोंधवडी ग्रा उपसरपंच डॉ तुळशीराम खारतोडे सरपंच .सारिका हनुमंत शिंदे ,हनुमंत शिंदे नवनाथ पवार डॉ मल्हारी पवार , दशरथ भोसले,दत्तात्रय हरिबा पवार , प्रदीप बंडगर सह पोंधवडी ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ पोंधवडी यांनी केले.या कार्यक्रमामध्ये जास्थित जास्थ लोकांनी उपस्थित राहून गावामध्ये साधू संतांचे विचार मनी बाळगून संपूर्ण गाव अद्यत्मिक होऊन एकमेकास साह्य करू असे अव्हान आयोजकांनी समस्थ ग्रामस्था सह आजूबाजूच्या गावकर्यांना करण्यात आले
