अखेर बहु चर्चेत जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका जाहीर!
संपादकीय…..
जिल्हा परिषद पंचायत समिती यांचा कारभार प्रशासकावरती सुरू होता , बहु चर्चेत असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार या करता उमेदवार जंगी तयारीत होते अखेर जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजल्याने इच्छुक उमेदवारांची अखेर प्रतीक्षा संपल्याने , उमेदवारीसाठी लगबग पहावयास मिळणार आहे , 13 जानेवारी रोजी
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे .
“ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे , अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत . राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक घेण्याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली.
कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार ?
कोकण विभाग : रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग
पुणे विभागःसातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर , परभणी , धाराशिव , लातूर
“ या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रतिक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे , अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .
निवडणूक प्रक्रिया कशी असेन?
माहिती : १६ जानेवारी रोजी निघणार
उमेदवारी अर्ज : १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी
अर्जाची छाननी : २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी : २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार
मतमोजणी : ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता .
खऱ्या अर्थान निवडणूक जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार , पक्षातील एकनिष्ठ पदाधिकारी पक्षांमध्ये इन्कमिंग झालेले अधिक उमेदवार, पक्षांतर्गत चिघळलेला वाद या गोष्टीचा पक्षश्रेष्ठींना खूप मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरे जावा लागणार हे मात्र नक्कीच, एकंदरीत पाहता ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र एकंदरीत पाहण्यास मिळणार हे मात्र तितकच सत्य आहे,,

