भिगवण शेटफळ गडे जिल्हा परिषद गटात सौ राणी नानासो बंडगर उमेदवारीसाठी इच्छुक!
भिगवन/ प्रतिनिधी
नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर भिगवन शेटफळ जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीसाठी उमेदवार जोरदार तयारी मध्ये दिसत आहेत, हे जरी खरं असलं तरी पोंधवडी गाव हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणार गाव अशी तालुक्यामध्ये पोंधवडी गावची ख्याती आहे मात्र हे गाव नेहमीच , आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वंचित असल्याचे दिसून येत आहे , महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विचारांवर चालणारे गाव मात्र आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती न मार्केट कमिटी, कुठल्याच समित्यावर आतापर्यंत उमेदवार दिला नाही हे त्रिकालाबाजीत सत्य आहे, मात्र आत्ता कुठेतरी या गावाचा विचार व्हावा ह्या हेतूने, जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रदीर्घ असा अनुभव असणारे कुटुंब म्हणजे नानासाहेब अर्जुन बंडगर यांचे कुटुंब यांच्या पत्नी राणीताई नानासो बंडगर या दोन वेळा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य व दोन वेळा बिनविरोध सरपंच झाल्या असून , त्यांचे सासरे ही सरपंच भावजय ही सरपंच, आणि पती नानासाहेब अर्जुन बंडगर हेही सरपंच श्री हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन, पक्षप्रमुख अशी यांची राजकारणाची पार्श्वभूमी मजबूत असून , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी किंवा पक्षाच्या योगदानासाठी पक्षाची नेहमीच एकनिष्ठ असणाऱ्या या कुटुंबातील सदस्य सौ राणीताई नानासाहेब बंडगर यांना जिल्हा परिषद भिगवन शेटफळ गडे गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी याकरिता पोंधवडी गावचे मा सरपंच व श्री हनुमान विकास सोसायटीचे संचालक डॉ. तुळशीराम खारतोडे सह पोंधवडी गावातील ग्रामस्थांची जोरदार मागणी होत असल्याचे दिसून येत आहे, आमच्या टीमने यांच्याशी सविस्तर वार्तालाभ केले असता यांनी उमेदवारी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली तर नक्कीच समाज हिताचे किंवा भिगवन शेटफळ गटाच्या विकासासाठी सर्व परी प्रयत्न करणार असल्याचे मत नानासाहेब अर्जुन बंडगर व सौ राणीताई नानासाहेब बंडगर यांनी व्यक्त केले व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेवटी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे मत पोंधवडी गावचे मा सरपंच, श्री हनुमान सोसायटी पोंधवडी चे संचालक डॉ तुळशीराम खारतोडे यांनी व्यक्त केले व आमच्या मागणीला यश येईल अशी अपेक्षा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली,


