मुंबईसरकारी नोकऱ्या

रविकांत जाधव रेल्वेची 41 वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त ;

Spread the love

मुंबई /प्रतिनिधी: दत्तात्रेय अवघडे

रविकांत नामदेव जाधव यांनी तब्बल 41 वर्ष रेल्वे मध्ये सेवा बजावून 31 डिसेंबर 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले, इतक्या दिवस आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रामाणिकपणाचा अखेर निवृत्तीच्या रूपाने  मन सुन्न करणारे घटना त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहते , इतक्या दिवस सेवा बजावत असताना जी कामगार किंवा कर्मचाऱ्या बद्दलची जोडलेली घट्ट नाळ एकदमच तुटणार असल्याने अगदी दुःखद अंतकरणाने सेवेला पूर्णविराम मिळणार आहे. या निमित्ताने त्यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ रविवार दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता क्षण मंगल कार्यालय , नितिन रेसीडेन्सी, भातसयी रोड,वाशिंद पुर्व* ता.शहापूर. जिल्हा. ठाणे. या ठिकाणी आयोजित केला होता
कार्यक्रमाला मुख्य अतिथी / प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांची उपस्थिती होती,विधी संचालक विकास जाधव भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा
तसेच मि होणार सुपरस्टार महाराष्ट्र राज्य फेम गायक प्रबुद्ध जाधव, रविकांत जाधव निकटवर्तीय बाळू पवार व *महा24 तास*चे पत्रकार दत्तात्रय प्रल्हाद अवघडे आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते , अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्यपद्धतीला व केलेल्या सेवेच्या कामाबद्दलच्या कार्याला उजाळा दिला, रविकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केलेल्या सेवेचा पूर्ण वृत्तांत तसेच इथून इथून पुढच्या काळात कामाचा जरी सहवास तुटला तरी ऋणानुबंधाचे नाते अविरतपणे जपून ठेवणार असल्याचे सांगितले व गहिवरलेल्या अंतकरणाने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला, व आलेल्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले भावनिक शब्दात आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
सुत्रसंचालन शरदजी कांबळे कसारा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *