डॉ . भगवंत पवार यांचे यूपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेमध्ये यशाला मोठी गवसणी!
मुंबई /प्रतिनिधी : _ दत्तात्रेय अवघडे
वडशिवणे ता, करमाळा जिल्हा, सोलापूर येथील तरुण भगवंत गणेश पवार यांनी
अवघ्या २३ व्या वर्षी ऑल इंडियामधून
२५ वा रँक प्राप्त करून यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून वैद्यकीय अधिकारी क्लास वन पदासाठी निवड झालेली आहे . यूपीएससीद्वारे वैद्यकीय अधिकारी पदाकरिता घेतली जाणारी लेखी परीक्षा २० जुलै रोजी पार पडली . ती परीक्षा पास झाल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी यूपीएससी सेंटर दिल्ली येथे मुलाखत यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सीएमएस परीक्षेचा फायनल रिझल्ट २२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला . डॉ . पवार यांची आई वंदना पवार या आरोग्य खात्यात आशा वर्कर म्हणून काम करतात,
डॉ . भगवंत पवार यांचे
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वडशिवणे व माध्यमिक शिक्षण अजितदादा पवार विद्यालय , वडशिवणे येथे मराठी माध्यमातून झाले असून , अकरावी – बारावी सोनवणे कॉलेज , उक्कडगाव या ठिकाणी झाले . एमबीबीएस एम्स हैदराबाद येथे झाले . वैद्यकीय शिक्षण घेत असताना एम्समध्ये चार गोल्ड मेडल मिळवून ते टॉपर राहिले . एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर एम.डी.साठी घेतली जाणारी आयएनआय सीइटी एक्झाम ते देशातून ६६८ व्या रँकने उत्तीर्ण झाले . आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव व मला काहीतरी बनायचे आहे हे ध्येय उराशी बाळगून अभ्यासातील सातत्य कायम ठेवत ते आज यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी झालेले आहेत . त्यांच्या या यशाबद्दल व चिकाटी बद्दल गावागावातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे , त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा परिषद शाळेचा ही मोठा आदर्श ग्रामस्थ नागरिक व मुलांमध्ये ठेवला आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये शाळा शिकून एखादा मुलगा एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो याची प्रचिती समस्त महाराष्ट्रामध्ये यांच्या रूपाने सर्वांना आली आहे, महा 24 तास या दैनिक न्युज पोर्टल परिवार तर्फे व दत्तात्रय प्रल्हाद अवघडे( प्रतिनिधी-महा24 तास) कुटुंबा तर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ,,,

